टीझरने वाढवली उत्सुकता
कलर्स मराठीने नुकताच 'बिग बॉस मराठी ६' चा एक खास टीझर प्रदर्शित केला आहे, ज्याने यावर्षीच्या शोची थीम आणि धमाका कसा असेल, याची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे.
टीझरमध्ये सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला आहे तो म्हणजे 'दरवाजा'. यावेळेस घरात एक नाही, तर अनेक दरवाजे असणार आहेत. दारांमधून येणारा रहस्यमय प्रकाश, त्यांची अनोखी रचना आणि गुढ वातावरण हे सूचित करते की, यंदाचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे. 'एकाऐवजी अनेक दरवाजे' म्हणजे गेममध्ये मोठे ट्विस्ट असणार हे निश्चित आहे. सदस्यांसाठी बाहेर पडण्याचे अनेक मार्ग असतील की, त्यांना त्यांच्या नशिबाचा दरवाजा स्वतःच निवडावा लागणार? या प्रश्नांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
'भाऊचा कट्टा' पुन्हा भरणार का?
गेल्या पर्वापासून अभिनेता रितेश देशमुख हे 'बिग बॉस मराठी'चे सूत्रसंचालन करत आहेत आणि त्यांचा 'भाऊचा कट्टा' प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अशातच यंदाही रितेश देशमुखच होस्ट करणार का? आणि 'भाऊचा कट्टा' पुन्हा एकदा घराघरात पाहायला मिळणार का? याबद्दलही जोरदार चर्चा सुरू आहेत.
मनोरंजनाचा बाप लवकरच परततोय!
सध्या 'बिग बॉस मराठी ६' बद्दलची सर्व माहिती पूर्णपणे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पण लवकरच ही सर्व माहिती उलगडणार आहे. स्पर्धकांची नावे, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षातील मोठे ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांसमोर येतील.
महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा दमदार आवाज घुमण्याच्या तयारीत आहे. मनोरंजनाचा बाप 'बिग बॉस मराठी सिझन ६' लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
