Dharmendra: 'मला आत जाऊद्या', धर्मेंद्र यांना शेवटचं पाहण्यासाठी वेडीपिशी झाली चाहती, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ चित्रपटसृष्टीवरच नाही, तर त्यांच्या लाखो चाहत्यांवरही शोककळा पसरली आहे.
मुंबई: बॉलिवूडचे लाडके 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ चित्रपटसृष्टीवरच नाही, तर त्यांच्या लाखो चाहत्यांवरही शोककळा पसरली आहे. जुहू येथील निवासस्थानाहून त्यांचा पार्थिव मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. याचवेळी, स्मशानभूमीबाहेर धर्मेंद्र यांच्या एका महिला फॅनने केलेला भावूक हट्ट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
पवन हंस स्मशानभूमीबाहेर धर्मेंद्र यांच्या अंतिम संस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत उभ्या असलेल्या एका महिला चाहत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला पोलिसांसमोर रडत रडत विनंती करताना दिसत आहे. ही महिला स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या पोलिसांना वारंवार "मेरे को जाने दो!" अशी विनवणी करत होती.
advertisement
विनंती करूनही प्रवेश मिळत नाही, हे पाहून या महिलेने थेट आपल्या पिशवीतून पैशांचा बंडल काढला आणि तो पोलिसांना दाखवत म्हणाली की, तिला हे पैसे धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराच्या चितेवर जाळायचे आहेत. हा प्रसंग धर्मेंद्र यांच्या चाहत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल किती अफाट प्रेम होते, हे दर्शवतो.
advertisement
advertisement
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीवर शोककळा
धर्मेंद्र हे गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. अखेरच्या महिन्यांमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, एका वेळी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. यापूर्वी त्यांना स्नायूंमध्ये ताण आणि पाठदुखीसारख्या समस्यांमुळेही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dharmendra: 'मला आत जाऊद्या', धर्मेंद्र यांना शेवटचं पाहण्यासाठी वेडीपिशी झाली चाहती, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO VIRAL


