TRENDING:

सुदामेने पोस्ट डिलिट केली पण त्याच्या मित्राने नाकावर टिच्चून तसाच Video केला, काही तासांतच 1 मिलियन VIEWS

Last Updated:

सध्या सोशल मीडियावर अथर्व सुदामेच्या एका व्हिडिओवरून मोठा वाद सुरू आहे. याच वादात आता अथर्वचा मित्र आणि प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार डॅनी पंडितने एक नवा व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या सोशल मीडियावर अथर्व सुदामेच्या एका व्हिडिओवरून मोठा वाद सुरू आहे. गणपतीच्या मूर्तीबद्दल त्याने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यावरून काही लोकांनी त्याला खूप ट्रोल केलं. त्यामुळे त्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला. या वादामुळे ‘पुणेकरांचीइज्जत काढली’ असा आरोपही त्याच्यावर झाला होता. पण, याच वादात आता अथर्वचा मित्र आणि प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार डॅनी पंडितने एक नवा व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे.
News18
News18
advertisement

अथर्व सुदामेच्या व्हिडिओमध्ये तो एका गणपतीच्या कारखान्यात जातो, जिथे गणपती बनवणारा माणूस मुस्लिम असतो. त्याची ओळख समोर येताच तो अथर्वला म्हणतो की तुम्ही दुसऱ्या दुकानातूनही मूर्ती खरेदी करू शकता. अथर्व त्याला सांगतो की, माझे वडील सांगतात, ‘आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीर खुर्माही. तसंच आपण वीट व्हावं जी देवळातही लावली जाते आणि मशिदीमध्येही.’ या व्हिडिओवरूनच त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. या व्हिडिओवर पुण्यातील माजी मनसे नेते वसंत मोरे यांनीही कडक शब्दात टीका केली होती.

advertisement

डॅनी पंडितचा व्हिडिओ व्हायरल

अथर्वच्या व्हिडिओमुळे सुरू झालेल्या वादात आता डॅनी पंडितने एक नवीन व्हिडिओ बनवून आपली बाजू मांडली आहे. या व्हिडिओमध्ये डॅनीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं दिसत आहे. तो आणि त्याचे मित्र गणपतीची आरती करत आहेत.

पुढल्या वर्षी दोनाचे चार हात होणार! सुचित्राला ठेवायचं होतं सीक्रेट, पण सोहमने आईबाबांसमोरच दिली लग्नाची कबुली

advertisement

आरती सुरू असतानाच दारावर एक मुस्लिम महिला येते आणि तिच्या मुलीला हाक मारते. ती मुलगी लगेच आरतीतून बाहेर जाते. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मात्र काही वेळाने ती मुलगी हातात मोदकांनी भरलेलं ताट घेऊन परत येते. डॅनी तिला विचारतो की, “हे मोदक तू बनवले का?” तेव्हा ती मुलगी उत्तर देते, “नाही, अम्मीने बनवलेत.”

advertisement

त्या मुलीची अम्मीही तिच्या मागून डॅनीच्या घरी येऊन सगळ्यांना मोदक खाण्याचा आग्रह करते. सगळे खुश होतात आणि मोदक खातात. डॅनीच्या या व्हिडिओने आता लोकांची मनं जिंकली आहेत. या व्हिडिओमधून त्याने कोणताही मोठा डायलॉग न वापरता शांतपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
सुदामेने पोस्ट डिलिट केली पण त्याच्या मित्राने नाकावर टिच्चून तसाच Video केला, काही तासांतच 1 मिलियन VIEWS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल