डॉन लोकांची होणार पोलखोल
झी मराठीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'चला हवा येऊ द्या'च्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गौरव मोरेची आई, प्रियदर्शन जाधवची पत्नी, भारत गणेशपुरेची पत्नी, अभिजीत खांडकेकरची पत्नी आणि मराळमोळी अभिनेत्री सुखदा, कुशल बद्रिकेची पत्नी सुनयना सहभागी झाले आहेत. त्यामुळे 'चला हवा येऊ द्या'चा आगामी भाग खूपच स्पेशल असणार आहे.
advertisement
डॉन लोकांची पोलखोल करत येत आहेत आतले खास खबरी, असं म्हणत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये, घरातले पाहुणे भेटायला आले, सेलिब्रिटी रंगात आले असं म्हटलं गेलं आहे. दरम्यान प्रियदर्शन जाधव भर कार्यक्रमात आपल्या पत्नीला हातात फुलं घेऊन म्हणतोय,"आई-बाबा आणि साईबाबाची शपथ रोझ नाही मिळालं पण रोज प्रेम करेन". दरम्यान भारत गणेशपुरे आपल्या पत्नीसोबत डान्स करत म्हणतोय,"ज्यांना डान्स येतोय ते घाबरतील आपल्याला येतच नाही तर घाबरायचं कशाला?". पुढे गौरव मोरे आपल्या आईला म्हणतोय,"आज लय सोनं घालून आली मातोश्री". त्यावर अभिजित खांडकेकर गौरव मोरेच्या आईला म्हणतोय,"वयाच्या कितव्या वर्षापर्यंत त्याने मार खाल्लाय". या प्रश्नाचं उत्तर देत गौरवची आई म्हणते,"पाच महिने झाले. आता पण मारलं, असं म्हणत त्या गौरवचे केस ओढत त्याला भर मंचावर मारताना दिसून येत आहेत".
फिल्टर पाड्याचा बच्चन, अशी गौरव मोरेची ओळख आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा सर्व माध्यमांवर तो आघाडीवर आहे.