TRENDING:

Gautami Patil Video: अलका कुबलसोबत गौतमी पाटीलचा येतोय नवा सिनेमा? Video ने वाढवली उत्सुकता

Last Updated:

Gautami Patil Video: प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलला कोणी ओळखत नाही असं कोणीच नाहीये. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच गौतमीचे चाहते आहेत. अगदी महिलाही गौतमीच्या कातिल अदाकार फिदा आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलला कोणी ओळखत नाही असं कोणीच नाहीये. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच गौतमीचे चाहते आहेत. अगदी महिलाही गौतमीच्या कातिल अदाकार फिदा आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गौतमीची प्रसिद्धी आणि क्रेझ वाढत चालली आहे. अशातच गौतमी पाटीलचा नवा व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये ती ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलसोबत दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अलका कुबलसोबत गौतमी पाटीलचा येतोय सिनेमा?
अलका कुबलसोबत गौतमी पाटीलचा येतोय सिनेमा?
advertisement

गौतमी पाटीलने नुकताचं तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती अलका कुबलला भेटून त्यांच्यासोबत गप्पा मारताना दिसली. एवढंच नाहीतर बाकी अनेक मराठी कलाकारांनाही ती भेटली. या खास भेटीचा व्हिडिओ गौतमीने शेअर करताच प्रचंड व्हायरल होतोय.

गौतमीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती अलका कुबल, सई ताम्हणकर, शिव ठाकरे, अभिनेते संजय खापरे या मराठमोळ्या कलाकारांबरोबर दिसत आहे. या कलाकारांची ग्रेट भेट पाहून लोक उत्सुक आहेत. सगळे नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात असून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

advertisement

गौतमीने शेअर केलेल्या व्हिडिओसोबत एक खास कॅप्शनही दिलं आहे. 'खूप छान वाटले सगळ्यांना भेटून' असं गौतमी म्हणाले. गौतमीच्या या व्हिडिओवर भरपूर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळतोय. अनेकांनी म्हटलं, साधी माणसं खूप पुढे जातात, खूप छान स्वभाव आहे गौतमीचा, शीच तुझी प्रगती होऊ दे स्वामी चरणी प्रार्थना, मन साफ असेल की देव पण साथ देतो, स्वतःला change केलंस after your contravercy त्यामुळे आज यश पाहतेस. अशा कमेंटचा भरपूर वर्षाव पहायला मिळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil Video: अलका कुबलसोबत गौतमी पाटीलचा येतोय नवा सिनेमा? Video ने वाढवली उत्सुकता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल