या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गौतमी म्हणाली, "आम्ही कलाकार आहोत आमचं काम फक्त कला सादर करणं असतं. कार्यक्रमाचं आयोजन आणि व्यवस्थापन मॅनेजमेंट टीम बघते. त्या कार्यक्रमाचं पूर्ण मानधन मिळालं होतं आणि शो उत्तम पार पडला. कार्यक्रमानंतर वैष्णवीबाबत घडलेल्या गोष्टींची माहिती नव्हती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तपशील विचारून घेतले तेव्हा असं सगळं झाल्याचं मला समजलं."
advertisement
दोषीला शिक्षा झाली पाहिजे - गौतमी
गौतमी म्हणाली, "ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. जो दोषी आहे त्याला लवकरात लवकर सापडून कडक शिक्षा झाली पाहिजे. वैष्णवीच्या कुटुंबाची भावना मी समजू शकते. मी तिच्या बाजूनेच आहे."
कलाकारांना वादात ओढू नका - गौतमी
गौतमीने स्पष्ट केलं की, "आम्ही फक्त आमची कला सादर केली. एक विनंती आहे की कोणत्याही कलाकाराला त्याच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही वादात खेचू नका. मी फक्त डान्स केला होता. बाकीचं मला काहीही माहिती नाही."
महिलांसाठी खास संदेश
गौतमी पाटीलने महिलांसाठी एक स्पष्ट संदेश दिला. ती म्हणाली, "मी प्रत्येक वेळी सांगत असते, महिलांनी कोणालाही घाबरून शांत बसू नये. तुम्ही जर काही चुकीचं अनुभवत असाल तर लगेच बोला. नाहीतर ते आणखी त्रासदायक होत जातं. योग्य वाटतं ते करा आणि वेळेत निर्णय घ्या."