डान्सर गौतमी पाटीलला वैष्णवीच्या दीर सुशील हगवणेने बैलाच्या वाढदिवसाला डान्स करण्यासाठी बोलावलं होतं. या कार्यक्रमाची भरपूर चर्चा झालेली. आता या कार्यक्रमाचे व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरण तापताच गौतमीचे हे व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागले. यावर गौतमीने रिअॅक्शन दिली आहे.
advertisement
वैष्णवी हगवणे प्रकरणावर काय म्हणाली गौतमी पाटील?
अचानक त्या कार्यक्रमातील डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मला वैष्णवीच्या प्रकरणाविषयी कळालं असं गौतमी म्हणाली. "आम्ही कलाकार असतो. आमचं काम म्हणजे केवळ आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करणं. शोचं संपूर्ण व्यवस्थापन आयोजकांकडे असतं. आम्हाला आमचं मानधन मिळालं आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडला."
गौतमी पुढे म्हणाली, 'ही घटना खूपच दुर्दैवी आहे. मी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवते. जो कोणी दोषी आहे, त्याला कठोर शिक्षा मिळायला हवी. वैष्णवीच्या कुटुंबाच्या वेदना मी समजू शकते... मी पूर्णपणे तिच्या बाजूने आहे."
दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आता या प्रकरणी न्यायालयात युक्तीवाद सुरु आहे.