गौतमी पाटीलचा नवा प्रोमो व्हिडीओ समोर आलाय. गौतमी स्टार प्रवाह वाहिनीवर दिसणार आहे. पण काय निीमित्त आहे? याविषयी जाणून घेऊया. आता होऊ दे धिंगाणा शो लवकरच 100 भाग पूर्ण करणार आहे. याच निमित्ताने गौतमीचा खास परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे.
advertisement
दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिॲलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजनासाठी ही मेजवाणी स्टार प्रवाह वाहिनी आणत असते. या वाहिनीवरीललोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणा लवकरच 100 भाग पूर्ण करणार आहे. पहिल्या पर्वापासून आता होऊ दे धिंगाणाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधवचं खुमासदार सूत्रसंचालन आणि प्रवाह परिवाराचा सळसळता उत्साह हे या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने वेगळेपण.
100 भागांच्या या प्रवासात या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मनोरंजनाचा हा प्रवास असाच अखंड रहाणार आहे. शंभराव्या भागाच्या खास सेलिब्रेशनमध्ये प्रवाह परिवारासोबतच गौतमी पाटील, धनंजय पोवार आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर देखिल सामील होणार आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका आता होऊ दे धिंगाणा शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.