गिरीजा उत्तम अभिनेत्री आहेत पण त्याचबरोबर ती उत्तम गायिका देखील आहे. नॅशनल क्रश फक्त अभिनयच नाही गोड गळ्याची गायिका देखील आहे. गिरीजा उत्तम गाते. गिरीजानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना' हे गाणं तिनं गायलं आहे. द फॅमिली मॅनच्या जेकेबरोबर तिनं हे गाणं गायलं आहे. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गिरीजा ओकचं गाणं ऐकून तिचा नवरा सुह्रद गोडबोले तिच्यावर फिदा झालाय. व्हिडीओखाली सुह्रदनं केलेली कमेंट चर्चेत आली आहे.
advertisement
( Girija Oak : साडी प्रिया बापटची, फेमस झाली गिरीजा ओक; अखेर त्या व्हायरल ब्लू साडीचं सीक्रेट आलं समोर )
"तळपदे मीट्स मिसेस झेंडे ऑन TunesDay. थँक्यू गिरीजा ओक. आमची नॅशनल क्रश", असं म्हणत जेके म्हणजेच अभिनेता शरीब हाशमी यानं गिरीजासोबत गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यानिमित्तानं शरीब देखील उत्तम मराठी बोलतो आणि गातो हे देखील पाहायला मिळालं. गिरीजानं अनेक दिवसांनी गाताना पाहून तिच्या चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
शरीब आणि गिरीजा ओकच्या गाण्यावर गिरीजाचा नवरा फिदा झाला आहे. त्यानं व्हिडीओ केलेली कमेंट चर्चेत आली हे. मालाड सुप्रिमसी अशी कमेंट सुह्रद गोडबोले यानं केली आहे. सुह्रदची ही कमेंट चांगलीच व्हायरल झाली आहे. सुह्रदलाही गिरीजाचं गाणं आवडलं असून त्यानेही कौतुक केलं आहे.
गिरीजा ओक उत्तम गाते. सोनी मराठीवरील सिगिंग स्टार या मराठी रिअलिटी शोमध्ये देखील सहभागी झाली होती. तिथे गिरिजाने वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली होती. सिगिंग स्टारचा हा सीझन फक्त कलाकारांसाठी होता. त्यात मराठीतील अनेक कलाकारांची सहभाग घेतला होता. गिरीजानं लावणीपासून भक्तगीतं तसंच शास्त्रीय गाणी देखील गायली होती. गिरीजाचं रुपेरी वाळूत हे गाणं ऐकल्यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा तिच्या सिगिंग स्टारमधील गाण्यांची आठवण झाली आहे.
