सूरज चव्हाणने लेखक, दिग्दर्शक केदार शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. केदार शिंदेना मिठी मारतानाचा फोटो सूरजने त्याच्या इंस्टावर शेअर केला आहे. हा फोटो अगदी काहीच वेळात व्हायरल झाला आणि लोकांचं लक्ष वेधून घेऊ लागला.
advertisement
सूरजने केदार शिंदेंसोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझा देव', ही पोस्ट व्हायरल होताच लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळाला. अनेकांनी सूरजला केदार शिंदे स्वामी म्हणून भेटले आहेत, ज्याला हात लावेल, त्याला सोने करणारी व्यक्ती केदार शिंदे, सहनशक्तीच्या छातीवर पाय देऊन समोर जाणारा सूरज भाऊ चव्हाण, संधी एकदाच मिळते सूरज त्याचे सोने कर, स्वतःच्या हिमतीवर मिळवलेले यश, अशा अनेक कमेंटचा पाऊस पहायला मिळत आहेत.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात सुरुवातीला सूरजला गेम कळाला नाही, खेळला मात्र हळूहळू त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. प्रेक्षकांचं मन जिंकून आणि जास्त वोटिंग मिळवून त्याने ही ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं आणि अखेर 70 दिवसांच्या शोचा राजा, विनर ठरला.