एक नक्षलवादी आणि त्याच्या मुलीची हृदयस्पर्शी कथा
‘अरण्य’ हा चित्रपट एका नक्षलवादी बापाची आणि त्याच्या लहान मुलीची हृदयस्पर्शी कथा सांगतो. चित्रपटात हिंसेच्या मार्गावरून शांतता, शिक्षण आणि विकासाच्या मार्गावर आलेल्या लोकांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ‘अरण्य’ हा सामाजिक वास्तवावर आधारित चित्रपट असून, तो १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
या चित्रपटात हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासोबत हृतीका पाटील, वीणा जगताप, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, अमोल खापरे आणि चेतन चावडा यांसारखे दमदार कलाकार आहेत. चित्रपटाचं संगीतही खास असून, त्यात आदिवासी लोककलेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे प्रेक्षकांना एक अस्सल आणि सिनेमॅटिक अनुभव मिळेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक!
‘अरण्य’चं पोस्टर लाँच करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाचं कौतुक केलं. ते म्हणाले, “सिनेमात परिवर्तनाची कथा सांगण्याची ताकद आहे. ‘अरण्य’ हा असाच एक चित्रपट आहे, जो हिंसेला सोडून शांततेचा मार्ग निवडणाऱ्या लोकांचा प्रवास दाखवतो. हा चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव टाकेल.”
यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘एक तिकीट, एक वृक्ष’ या संकल्पनेचंही कौतुक केलं. ‘अरण्य’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक अमोल दिगांबर करंबे आहेत, तर निर्मिती एस. एस. स्टुडिओज आणि एक्सपो प्रेसेंट यांनी केली आहे.