अभिनेत्री नवनिंद्रा बहल यांनी खूप लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत तिने नाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले. ती कंगना रणौतच्या 'क्वीन' या चित्रपटात तिच्यासोबत दिसली होती. आपल्या कामातून तिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
advertisement
अभिनेत्री नवनींद्र बहल यांनी कोरोना काळात नवरा गमावला गमावला. ललित बहल असं त्यांचं नाव असून 2021 साली त्यांचं निधन झालं. ललित बहल हे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक होते.
'माचिस', 'ओये लकी! ओये लकी!' सारखे सिनेमे त्याचबरोबर 'द प्राइड' आणि 'द गुरू' सारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्येही काम केलं आहे. 'इश्कबाझ', 'दिल बोले ओबेरॉय', 'विजी', 'सदा ए-वादी' सारख्या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं.
नवनींद्र बहल यांचा मुलगा कानू बहल याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आईचा जुना फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "मी माझ्या आईला माझा दैवी आधारस्तंभ, माझी श्रद्धा, माझं प्रेम, माझी मार्गदर्शक' आणि माझं सर्वस्व होती. माझी आई माझी गुरू आहे. जोपर्यंत तू मला पुनर्जन्म देत नाहीस तोपर्यंत माझे डोळे तुझ्या अतुलनीय हास्याचा शोध घेत राहतील. माझ्या आत्म्याला प्रकाशमान केल्याबद्दल धन्यवाद."
कानूच्या या पोस्टनंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आणि या कठीण काळात अभिनेत्रीच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त केली.
