Jhund Actor : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या चित्रपटात 'बाबू छत्री' ही भूमिका साकारणाऱ्या प्रियांशू क्षत्रिची नागपूरमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 'झुंड' या चित्रपटामुळे बाबू संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला होता. पटरीकिनारी मित्रांसोबत कोळसा विकून मजा करत असलेला मुलगा नागराज मंजुळेंनी हेरला तो होता बाबू म्हणजेच प्रियांशू. डान्स, स्टंट, डायलॉग अशी रितसर ऑडिशन घेतल्यानंतर नागराज मंजुळेंनी बाबूची निवड केली.
advertisement
एबीपी माझाला 'झुंड'बद्दल दिलेल्या मुलाखतीत बाबू म्हणाला होता,"मी पटरीकिनारी मित्रांसोबत बसलो होतो. कोळसा विकलेला असल्याने आमच्याकडे पैसे होते. तेवढ्यात नागराज मंजुळेंची एन्ट्री आले. सुरुवातीला मला ते पोलीस वाटले त्यामुळे आम्ही पळणार होतो. पण नंतर ते कॅमेरावगैरे घेऊन उतरले. त्यामुळे मला ते न्यूजवाले आहेत, असं वाटलं. सुरुवातीला मी त्यांना हलक्यात घेतलं होतं. नंतर सिनेमाचं शूटिंग असल्याचं मला कळलं. डान्स, डायलॉग अशा गोष्टी करायला लावल्या, ऑडिशन घेतली".
Nagpur Crime : चाकूने गळा चिरला, दगडाने ठेचून मारला; नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधला बाबू छत्री होता कोण?
बाबू पुढे म्हणाला,"त्यानंतर टीममधील मंडळी मला शोधत माझ्या घरी गेली. त्यावेळी आईने त्यांना शिव्या घातल्या होत्या. आईला वाटायचं की मित्रांमुळे मी बिघडलो गेलो आहे. घरी ऑडिशनचं सांगितलं तेव्हा आई म्हणालेली,"तुला काय पाहून घेतलंय. त्यांना किडनी विकावी लागेल". दुसरीकडे ज्या मित्रांची आई मला म्हणायची की तू आमच्या मुलांना बिघडवतो आहेस त्यांच्यासोबत राहू नको. या चित्रपटानंतर उलटं झालं त्यांची आई म्हणू लागली की माझ्या मुलांना तुझ्यासोबतच ठेव. अमिताभ बच्चन यांच्यासमोर नेलं तेव्हा मी त्यांनाच पाहत होतो. हे खरे आहेत की खोटे हेच मला कळत नव्हतं".
झोपडपट्टीतला बाबू कसा तयार झाला?
नागराज मंजुळे म्हणालेले,"बाबू अजिबात कॅमेऱ्याला जुमानत नाही. त्याचा स्वभाव आहे तो कोणालाच जुमानत नाही. ही खूप भारी गोष्ट आहे. डायलॉग सांगितल्यानंतर त्याला ज्यापद्धतीने सांगितलं असतं त्यापद्धतीने तो बोलतो. तो प्रचंड डँबिस आहे.