TRENDING:

पूर्णाआजीच्या रोलसाठी कोणाची एन्ट्री होणार आणि कधी? जुई गडकरीने दिली महत्त्वाची अपडेट

Last Updated:

Jyoti Chandekar Replacement in Tharal Tar Mag : ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेत पूर्णआजीची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अभिनेत्री जुई गडकरीनं यावर भाष्य केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला. वयाच्या 78व्या वर्षी ज्योती चांदेकर अभिनय क्षेत्रात सक्रीय होत्या. स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेत त्या पूर्णआजीची भूमिका साकारत होत्या. ठरलं तर मग मधील पूर्णाई प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली होती. पूर्णाईने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण ज्योती चांदेकर यांच्या अचानक निधनाने मालिकेच्या संपूर्ण टीमला धक्का बसला आहे. ज्योती चांदेकर यांनी पूर्णाई इतकी चोख साकारली होती की त्यांच्याशिवाय या भुमिकेसाठी प्रेक्षक कोणालाही पाहू शकत नाही. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अशाच प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.
News18
News18
advertisement

पण मालिका म्हटल्यावर त्याचं कथानक पुढे जाणार. ठरलं तर मग मालिका सध्या महत्त्वाच्या वळणावर आहे. या वळणावर पूर्णाईची भूमिका अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णाआजी कोण साकारणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अभिनेत्री जुई गडकरी हिनं याबद्दल अपडेट दिली आहे.

( 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ऑफ एअर! 'या' दिवशी टेलिकास्ट होणार Last Episode )

advertisement

जुई गडकरीनं नुकतंच आस्क मी एनिथिंग सेशन घेतलं होतं. त्यात तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. ज्यात एक प्रश्न नव्या पूर्णाआजीबद्दल होता. पूर्णा आजीच्या रोलसाठी कोणाची एन्ट्री होणार आणि कधी? असा प्रश्न जुईला विचारण्यात आला. याचं उत्तर देत जुईनं सांगितलं, याबद्दल मला खूप प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही सगळे तिला खूप मिस करत आहोत. पण आता नवीन कोण येणार हे सगळं आम्हालाही माहिती नाहीये. या सगळ्या गोष्टी चॅनलच्या डिसिजनवर असतात. सो चॅनेलकडून अधिकृतरित्या काही कळल्याशिवाय कोणीतरी युट्यूब, इन्स्टा, एफबीला येणाऱ्या न्यूजवर विश्वास ठेवू नका.

advertisement

जुई गडकरी हिनं या आधी अनेकदा ज्योती चांदेकर यांच्याबरोबरच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. दोघींचं अगदी आजी आणि नातीसारखं नातं होतं. जुईने या सेशलनमध्ये हेही सांगितलं की, मी तिच्यासाठी अळूचं फदफद केलं होतं जे तिला खूप आवडलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
पूर्णाआजीच्या रोलसाठी कोणाची एन्ट्री होणार आणि कधी? जुई गडकरीने दिली महत्त्वाची अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल