'ठरलं तर मग' मालिकेने नुकतेच 900 भाग पूर्ण केले. आनंदाच्या क्षणी सेटवर पूर्णा आजी नसल्याची खंत संपूर्ण टीमला होती. त्यांच्या आठवणीत मालिकेच्या सेटवर सदाफुलीचं रोपटं लावण्यात आलं. अभिनेत्री जुई गडकरीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं, "आज 900 भाग पूर्ण झालेत. हे बघायला ती हवी होती, पण तिचे आशीर्वाद नक्कीच आहेत."
advertisement
तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट
जुईची पोस्ट रिशेअर करत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मालिकेच्या टीमला धीर दिला. तिने लिहिलं, "तिच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील, पण तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच राहील. जुई आणि ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम."
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम अस्वस्थ झाली. 16 ऑगस्ट रोजी ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या दहा दिवसांनंतरही त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी कलाकार सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
या आधी ज्योती चांदेकर यांची मोठी मुलगी पूर्णिमा पंडित हिनं देखील पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या होत्या. ठरलं तर मग मालिकेतील पूर्णाईला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल ती बोलली होती. माझ्या आईने काय कमावलं आहे हे मला कळलं असं म्हणत पूर्णिमानं भावुक पोस्ट लिहिली होती.