आजच्या धकाधकीच्या आयुष्यात खरं प्रेम आणि आपुलकीचा अनुभव फार कमी मिळत असतो. पण असे काही क्षण जे मनाला स्पर्श करतात आणि आयुष्यभर स्मरणात राहतात. असाच एक अनुभव अभिनेता कार्तिक आर्यनला आला आहे. दिव्यांग चाहत्याच्या भेटीनंतर कार्तिकला खरं प्रेम आणि आपुलकीची खरीखुरी ताकद दाखवून दिली आहे.
कार्तिक आर्यनने शेअर केला व्हिडीओ
advertisement
कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर दिव्यांग चाहत्यासोबतचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"तू बोलू शकत नाहीस, पण तुझ्या या काही मूल्य न करता येणाऱ्या भावनांमधून मी तुझे सर्व विचार ऐकू शकतो. तू ऐकू शकत नाहीस, पण मला खात्री आहे की, तू माझ्या प्रेमाचा प्रत्येक स्पर्श अनुभवू शकतोस. विशेष म्हणजे वारानसीवरुन हा चाहता खास मला भेटायला आला आहे. मला नक्कीच वाटतं की, मी चांगले कर्म केले असावेत, ज्यामुळे मला अशा पवित्र प्रेमाचा आणि स्नेहाचा अनुभव मिळाला. या चाहत्याने माझा दिवस खास बनवला आहे". कार्तिकच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.
अभिनेता कार्तिक आर्यन अनेकदा सामाजिक उपक्रमांमुळे सहभागी होत असतो. चित्रपट, वेबसीरिज, जाहिराती अशा सर्वच क्षेत्रांत त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 2025-2026 मध्ये कार्तिक आर्यन बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसून येईल. त्याचे अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. आशिकी 3, तू मेरी मैं तेरा-मैं तेरा तू मेरी, कॅप्टन इंडियासह अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे.