Actress One Night Stand Story : मनोरंजनाच्या दुनियेत अशा अनेक प्रेमकथा आहेत ज्या सतत चर्चेत असतात. बॉलिवूडमधील काही प्रेमकथा या अजरामर आहेत. तर काही फिल्मी आहेत. काही प्रेमकथा तर उदाहरण म्हणून मांडल्या जातात. अशीच एक प्रेमकहाणी आहे एका अभिनेत्री आणि तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याची. विशेष म्हणजे या दोघांनी पहिल्या भेटीनंतर काही दिवसांतच वन नाईट स्टँड केलं. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ते एकमेकांना डेट करू लागले. पुढे त्यांनी लग्नही केलं. आज त्यांना दोन मुलं आहेत. चला जाणून घ्या 'हे' दोघं कलाकार कोण आहेत आणि त्यांची प्रेमकहाणी काय आहे.
advertisement
कश्मीरा शाहने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या कृष्णा अभिषेकवर प्रेम केलेलं. कश्मीरा शाहने एका मुलाखतीमध्ये स्वतःच्या प्रेमकहाणीबाबत खुलासा केला होता. तिने सांगितलं की, ती जेव्हा कृष्णा अभिषेकला पहिल्यांदा भेटली, तेव्हा तिला त्याच्याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. एवढंच माहित होतं की तो बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेक यांनी 'और पप्पू पास हो गया' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट 2007 रोजी रिलीज झाला होता. शूटिंग दरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती.
Aishwarya-Salman : 'ऐश्वर्या-सलमान इतके जवळ होते की त्यांचं भांडण...' प्रसिद्ध संगीतकाराचा शॉकिंग खुलासा
'त्या' रात्री कश्मीरा अन् कृष्णा अभिषेकमध्ये झाला वन नाईट स्टँड
पहिल्या भेटीनंतर एका दिवशी कश्मीरा शाहने कृष्णा अभिषेकला हॉटेलमध्ये बोलावलं. कृष्णा तिथे पोहोचला आणि त्यांनी एकत्र जेवण केलं, खूप गप्पा मारल्या. कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेक यांच्यात त्या रात्री हॉटेलमध्ये वन नाईट स्टँड झाला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. पुढे 2013 साली त्यांनी लग्न केलं.
कश्मीराने दिला जुळ्या मुलांना जन्म
कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेक लग्नाच्या चार वर्षांनंतर, 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कृष्णा अभिषेकपूर्वी कश्मीरा शाहचं एक लग्न झालं होतं आणि तिचा घटस्फोटही झाला होता.
कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेक एकमेकांवर खूप प्रेम करतात. दोघांचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात आणि त्यांच्या सुंदर नात्याची साक्ष देतात.
कश्मीराचं पहिलं लग्न कोणासोबत झालेलं?
कश्मीराचं पहिलं लग्न एका विदेशी व्यक्तीसोबत झालं होतं. ते हॉलिवूड सिने-निर्माते आणि ब्रँड लिस्टमॅन होते. ऑनलाईन डेटिंग वेबसाईटवर त्यांची ओळख झाली होती. पण पहिल्या भेटीनंतरच त्यांनी संसार थाटण्याचा निर्मय घेतला होता. त्यानंतर 2002 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. पण हे नातं फार काळ टिकलं नाही आणि 2007 मध्ये ते विभक्त झाले.