समोसा, ढोकळा खावा इथंच, पुण्यातील प्रसिद्ध गृह उद्योग माहितीये का?
12 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या कैलास कुंटेवाड यांना आर्थिक परिस्थितीमुळे पुढे पदवीचं शिक्षण घेता आलं नाही. घरामध्ये हालाखीची परिस्थिती असल्यामुळे घराचं संपूर्ण आर्थिक गणित शेतीवरच अवलंबून होती. कैलास यांनी आपलं संपूर्ण ज्ञान युट्यूबवर व्हिडिओ पाहून आणि अनेक वेगवेगळे पुस्तक वाचून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडली. सोनी टेलिव्हिजनवरील 'कौन बनेगा करोडपती' शोच्या 17 व्या सीझनमध्ये कैलास कुंटेवाड हॉटसीटवर बसले होते. सलग 14 प्रश्नांची अचूक उत्तरे देत कैलास यांनी कैलास यांनी 50 लाख रूपये जिंकले. त्यांच्या ज्ञानाचं आणि खेळाचंही बिग बी अमिताभ बच्चन यांनी कौतुक केले. 15 वा प्रश्न विचारण्यात आला, किंमत होती 1 कोटी रूपये.
advertisement
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रसेवा समूहाचा पुढाकार, राबवला मदतीचा मोठा उपक्रम
जेव्हा कैलास यांना 1 कोटी रूपयांचा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा कैलास यांनी उत्तर देण्यासाठी लाइफलाइनचा वापर केला. त्यांनी आधी ‘व्हिडीओ कॉल अ फ्रेंड’ ही लाइफलाइन वापरली. पण तरीही उत्तराबद्दल शंका वाटत असल्याने पुढे त्यांनी ‘५०:५०’ लाइफलाइनचा वापर केला. पण, तरीसुद्धा त्यांना योग्य उत्तराची शंका होतीच. त्यामुळे त्यांनी धोका न पत्करता, शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ५० लाख रुपये इतकी रक्कम जिंकली. कैलास यांनी 50 लाख कोणत्याही लाईफलाइनचा वापर न करता, अगदी यशस्वी पद्धतीने खेळ खेळले आहे. त्यामुळे कैलास यांचं कौतुक बिग बीच नाही तर, नेटकरीही करीत आहेत.
कैलास कुंटेवाड यांना कोणता प्रश्न विचारला होता?
राष्ट्रपती भवनात ‘इन्व्हेन्शन ऑफ द प्रिंटिंग प्रेस’ हे विवियन फोर्ब्स यांचे चित्र कोणाला दर्शवते? असा एक कोटीचा प्रश्न कैलास यांना हॉटसीटवर विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी A.योहान फुस्त, B.विल्यम कॅक्स्टन, C.जोहान्स D.रिचर्ड एम असे उत्तराचे पर्याय देण्यात आले होते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होते B. विल्यम कॅक्स्टन. या प्रश्नामुळे कैलास कुंटेवाड यांना 1 कोटी रूपये जिंकता आले नाहीत. दरम्यान, 15व्या शतकामध्ये विल्यम कॅक्स्टन यांनी इंग्लंडमध्ये पहिला छापखाना सुरू केला होता. विल्यम कॅकस्टन हे पेशाने व्यापारी, लेखक आणि छापाकार (Printer) होते. त्यांच्यामुळे जगभरामध्ये इंग्रजी साहित्य जगभरामध्ये पोहोचले.