द आर्चीज या सिनेमात श्रीदेवीची लेक खुशी कपूर, शाहरूखची लेक सुहाना खान, बिग बींचा नातू अगस्त्य नंदा हे तीन स्टार किड्स आहेत. त्याचप्रमाणे अदिती आणि वेदांग रैना हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. केबीसीच्या मंचावर येणं या सगळ्यांसाठीच मोठी ट्रिट होती. अगस्त्य पहिल्यांदा आजोबांबरोबर स्क्रिनवर दिसणार होता. तर इतर सगळ्यांसाठी बिग बी हे आदर्श आहेत.
advertisement
हेही वाचा - शाहरूखनंतर दीपिकाचं देवदर्शन, Fighterच्या रिलीजआधी अनवाणी तिरूपतीला पोहोचली अभिनेत्री, Video
बिग बींनी सुहाना खानची खास ओळख सगळ्यांना करून दिली. बिग बी म्हणाले, तुम्ही हिला ओळखत नसाल तर मी सांगतो की ही शाहरूखची मुलगी आहे. त्यानंतर बिग बी सुहानाबरोबर सुपर संदूक राऊंड खेळतात आणि त्यात तिला शाहरूख संबंधित प्रश्न येतो.
प्रश्न असतो, शाहरूख खानला यातील कोणता अवॉर्ड मिळाला नाहीये? Option A-पद्मश्री, B - लीजन ऑफ ऑनर, C -L'Etoile, D- वेल्पी कप. या पर्यायामधून सुहाना A हा पर्याय सांगते. पण योग्य उत्तर हे पर्याय D हे असतं. सुहानाचं उत्तर ऐकून जोया आणि वेदांगी तिच्याकडे बघतात.
या राऊंडनंतर बिग बी सुहानाला म्हणाले, 'लेकीला माहितीच नाहीये की वडिलांना कोणता अवॉर्ड मिळाला आहे. आम्हाला सांगितलं होतं की समोर जे बसले आहेत त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे त्यामुळे प्रश्न थोडे आरामात विचारा. आता इतक्या आरामात प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देऊ शकली नाही'.