शाहरूखनंतर दीपिकाचं देवदर्शन, Fighterच्या रिलीजआधी अनवाणी तिरूपतीला पोहोचली अभिनेत्री, Video

Last Updated:

दीपिका आणि तिची बहिणी अनवाणी चालतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Deepika padukone tirupati temple
Deepika padukone tirupati temple
मुंबई, 15 डिसेंबर : 'पठाण' आणि 'जवान'नंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणचा 'फाइटर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता ऋतिक रोशनबरोबर ती प्रमुख भूमिकेत आहे. दीपिकाची देवावर श्रद्दा आहे हे सर्वांना माहिती आहे. फाइटरच्या रिलीजआधी दीपिका पादुकोण फॅमिलीबरोबर तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली आहे. शुक्रवारी दीपिकानं भगवान व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. दीपिकाबरोबर तिची छोटी बहिण अनीश आणि आई देखील होती. तिरूपती बालाजीच्या मंदिरातील दीपिकाचा व्हिडीओ समोर आला आहे.
विशेष म्हणजे दीपिकानं चालत व्यंकटेश्वराचा गड पूर्ण केला. तिरूपतीमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. अशा थंडीत तिनं गुरूवारी म्हणजेच 14 डिसेंबरला रात्री गड चढण्यास सुरूवात केली. दोन तासांची चढाई करून ती मंदिर परिसरात पोहोचली. दीपिकानं गड चढत असताना ब्लॅक कलरची हुडी आणि पँट कॅरी केली. रस्त्यात दीपिक आगीजवळ हात शेकवताना देखील दिसली.
advertisement
गुरूवारी रात्री 2 तासांची चढाई करून झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे दीपिका व्यंकटेश्वराच्या मंदिरात पोहोचली. दीपिका आणि तिची बहिणी अनवाणी चालतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुक्रवारी पहाटे दीपिका आणि तिच्या बहिणीनं चेंजिंग करून मंदिरात प्रवेश केला आणि व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं.
advertisement
दीपिकाआधी अभिनेता शाहरूख खान देखील शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला गेला होता. डंकी सिनेमाचं पोस्टर त्यानं साईबाबांच्या चरणी अर्पण केलं. शिर्डीआधी शाहरूख त्याची मॅनेजर पूजा ददलानीबरोबर वैष्णौ देवीच्या दर्शनासाठी गेला होता. शाहरूख एका वर्षात तिसऱ्यांदा वैष्णौ देवीला गेला होता.
advertisement
दीपिकाचा 'फाइटर' हा सिनेमा 2024ला रिलीज होतोय. सिनेमाचं प्रमोशन सुरू झालं. रिलीजच्या आधी दीपिकानं व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. 25 जानेवारी 2023 रोजी दीपिका आणि शाहरूख खानचा पठाण हा सिनेमा रिलीज झाला होता. बरोबर याच दिवशी 25 जानेवारी 2024ला दीपिका आणि ऋतिक रोशनचा फाइटर हा सिनेमा रिलीज होतोय. फाइटरनंतर दीपिका कल्कि 2898AD आणि सिंघम अगेन सिनेमातही दिसणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
शाहरूखनंतर दीपिकाचं देवदर्शन, Fighterच्या रिलीजआधी अनवाणी तिरूपतीला पोहोचली अभिनेत्री, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement