वैष्णौ देवीनंतर शाहरूख खान लेकीसह साई दर्शनाला, डंकीचं पोस्टर बाबांच्या चरणी केलं अर्पण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
शाहरूख खान त्याच्या प्रत्येक नव्या सिनेमाच्या रिलीजआधी देवदर्शन करत असतो. जवान, पठाण आणि आता डंकीसाठी देखील त्यानं देवदर्शन सुरू केलं आहे.
मुंबई, 14 डिसेंबर : अभिनेता शाहरूख खानचा या वर्षातील डंकी हा शेवटचा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात झाली आहे. डंकीच्या रिलीज आधी शाहरूख खान देवदर्शन करत असल्याचं दिसतंय. नुकताच तो वैष्णौ देवीच्या दर्शनासाठी गेला होता. वैष्णौ देवीचं दर्शन करून आल्यानंतर शाहरूख खान शिर्डीला पोहोचला आहे. शाहरूख खान शिर्डी विमानतळावर स्पॉट झाला. शाहरूखबरोबर डंकी सिनेमाची स्टारकास्ट देखील होती. सिनेमाच्या रिलीजआधी साईबाबांच्या चरणी साकडं घालण्यासाठी शाहरूख निघाला आहे.
शाहरूख खान त्याच्या प्रत्येक नव्या सिनेमाच्या रिलीजआधी देवदर्शन करत असतो. जवान, पठाण आणि आता डंकीसाठी देखील त्यानं देवदर्शन सुरू केलं आहे. सिनेमाच्या यशासाठी तो साईबाबांकडे साकडं घालणार आहे. विशेष विमानानं शाहरूख खान शिर्डी विमानतळावर दाखल झाला. त्याच्याबरोबर त्याची लेक सुहाना खान देखील होती. त्याचप्रमाणे डंकी सिनेमातील कलाकार देखील साईदर्शनासाठी पोहोचले.डंकी सिनेमाचं पोस्टर यावेळी साईचरणी अर्पण करत सिनेमाच्या यशासाठी साकड घातलं..
advertisement
शाहरूख शिर्डीत येणार यासाठी शिर्डी विमानतळावर विशेष सुरक्षा तैनात करण्यात आली होती. शाहरूखची कार ज्या ठिकाणी पार्क केलेली त्या ठिकाणी शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांनी शिर्डी विमानतळावर गर्दी केली होती. पण पोलिसांच्या सुरक्षेत शाहरूख सुखरूपपणे शिर्डी विमानताळावरून साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी रवाना झाला. शिर्डीला जाण्याआधी शाहरूख खान वैष्णौ देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्याची मॅनेजर पूजा ददलानी त्याच्याबरोबर होती. यावेळी वर्षभरात शाहरूख तिसऱ्यांदा वैष्णौ देवीला पोहोचला होता.
advertisement
डंकी हा सिनेमा शाहरूखचा 2023वर्षातील सगल तिसरा सिनेमा आहे. येत्या 21 डिसेंबरला डंकी हा सिनेमा रिलीज होणार आहे. शाहरूखच्या आतापर्यंतच्या सिनेमातील हा सर्वात लो बजेट सिनेमा आहे. सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. सिनेमात शाहरूखबरोबर अभिनेता विक्की कौशल, तापसी पन्नी, सतीश शाह,विक्रम कोच्चर हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहे.
दरम्यान शाहरूखची लेक सुहाना खान हिनं देखील द आर्जीस या सिनेमातून डेब्यू केला आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2023 4:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
वैष्णौ देवीनंतर शाहरूख खान लेकीसह साई दर्शनाला, डंकीचं पोस्टर बाबांच्या चरणी केलं अर्पण