किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, "उच्चभ्रूंनी हेटाळणी केलेल्या गौतमी पाटीलला नंबर वन चॅनेलच्या रिॲलिटी शो मध्ये घ्यावं लागतं. आणि ज्या सुरज चव्हाणवर 'ते' हसले, त्याचा सिनेमा येतोय म्हणून प्रेक्षकांवर लादलेल्या 'सो काॅल्ड' सुपरस्टार्सना त्यांचे सिनेमे पुढे ढकलावे लागतात. ही सांस्कृतिक वर्चस्ववादाला सर्वसामान्य प्रेक्षकांनी दिलेली सणसणीत मुस्काडात आहे !"
advertisement
( सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'मध्ये बिग बॉसची गँग, 'वाजीव दादा' गाण्याने केला कल्ला! )
एका वाक्यात किरण माने यांनी मराठी सिनेसृष्टीतील बदलती समीकरणं अधोरेखित केली आहेत.किरण माने यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहीजण त्यांच्या स्पष्टपणाचं कौतुक करतायत, तर काही जण यावर टीकाही करत आहेत.
सूरज चव्हाणचा 'झापूक झुपूक'
सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आणि बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाणचा 'झापूक झुपूक' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या अनाऊन्समेंटनंतर काही मोठ्या स्टार्सच्या सिनेमांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. 'झापूक झुपूक' या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
गौतमी पाटील स्टार प्रवाहवर झळकणार
गौतमी पाटील हिनं मागील 2-3वर्षांपासून महाराष्ट्र हलवून टाकला. स्टेज शो करणारी गौतमी घराघरात पोहोचली. तिच्या डान्सवर अनेकांनी टीका केली. तिनं देखील आपली चूक कबूल करत नव्याने सगळ्यांच्या मनात छाप उमटवली. तिची इतरांकडून हेटाळणीही झाली. मात्र आज ती मोठ्या स्टार्सबरोबर स्टेज आणि स्क्रिन शेअर करतेय गौतमी पाटील 'स्टार प्रवाह' या मराठीतील आघाडीच्या चॅनेलवर येणाऱ्या 'शिट्टी वाजली रे' या नव्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे. तिला पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे.