सुप्रीम कोर्टातील वकील सना रईस खान यांनी KRK यांच्या वतीने बाजू मांडली. त्यांनी KRK यांची अटक ही कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर असल्याचं म्हटलं आहे. "या प्रकरणात कोणताही ठोस गुन्हा बनत नाही. ही अटक मनमानी पद्धतीने करण्यात आली असून KRK यांचे घटनात्मक अधिकार डावलण्यात आले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना अटक करण्यात आली."
advertisement
( Salman Khan: बॉलिवूडमध्ये खळबळ, सलमान खानचा डायरेक्टरवर थेट वार; कोर्टात तक्रार, केली मोठी मागणी )
KRK यांनी कोणत्याही व्यक्तीवर किंवा इमारतीवर लक्ष्य साधून गोळीबार केल्याचा आरोपच नाही. KRK हे परवाना असलेले शस्त्रधारक आहेत. सहा दिवसांनंतर अचानक एका व्यक्तीनं ज्याचं नाव रिमांड रिपोर्टमध्येही नाही. गोळीबाराचा आवाज ऐकू आला असं सांगितलं. मात्र पिस्तुलची प्रभावी रेंज केवळ 20 ते 30 मीटर इतकी असते तर KRK यांच्या बंगल्यापासून संबंधित इमारतीचं अंतर तब्बल 1500 मीटर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि व्यावहारिकदृष्ट्या असा प्रकार घडणं अशक्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
दरम्यान मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ओशिवारा येथील एका निवासी इमारतीत फायरिंग झाल्याची तक्रार आल्यानंतर CCTV फुटेज तपासण्यात आले आणि अनेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले. चौकशीत फायरिंग KRK यांच्या परवाना असलेल्या बंदुकीतून झाल्याचं त्यांनी कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
जामिनावर सुटल्यानंतर KRK यांनी सोशल मीडियावर लिहिलं, "अपघाताला गुन्हा ठरवता येत नाही. अपघात कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो. पण जर कुणाला तुम्हाला त्रास द्यायचाच असेल, तर दोरीचाही साप बनू शकतो."
