दरवर्षी सामान्य भाविकांप्रमाणेच मोठमोठे सेलेब्रिटीही लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात. यंदा गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी अनेक सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही बाप्पाचे दर्शन घ्यायला लालबागला पोहोचली. पण तिच्यासोबत जी व्यक्ती होती तिला पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी जॅकलिनसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार होते. ते एकत्र 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आले होते. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
advertisement
पार्थ पवारांनी खिशातून नोटा काढल्या...
व्हिडिओमध्ये जॅकलिन देसी लुकमध्ये दिसली आणि तिने डोक्यावर ओढणीही घेतली आहे. ती मनोभावे बाप्पाची पूजा केली. तिच्यासोबत अभिनेत्री अवनीत कौर आणि पार्थ पवारही उभे आहेत. पण, याच वेळी पार्थ पवारांनी त्यांच्या खिशातून काही नोटा काढल्या आणि त्या जॅकलिनच्या हातात दिल्या. पार्थ पवारांनी दिलेल्या त्या नोटा जॅकलिनने लगेच बाप्पाच्या दानपेटीत टाकल्या. त्यानंतर दोघांनीही चरणस्पर्श करून राजाचं दर्शन घेतलं.
308 अफेअर्स, 3 लग्न आणि… 66 वर्षीय संजय दत्तला एकूण किती मुलं? एक मुलगी तर 37 वर्षांची
जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवारांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी जॅकलिनच्या साध्या लुकचं कौतुक केलं आहे, तर काहींनी ‘पार्थ यांनी जॅकलिनला पैसे का दिले?’ असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे जॅकलिन आणि पार्थ पवार यांच्यात काहीतरी खास नातं आहे की काय, अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.