पवन हंस स्मशानभूमीबाहेर धर्मेंद्र यांच्या अंतिम संस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत उभ्या असलेल्या एका महिला चाहत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला पोलिसांसमोर रडत रडत विनंती करताना दिसत आहे. ही महिला स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या पोलिसांना वारंवार "मेरे को जाने दो!" अशी विनवणी करत होती.
advertisement
विनंती करूनही प्रवेश मिळत नाही, हे पाहून या महिलेने थेट आपल्या पिशवीतून पैशांचा बंडल काढला आणि तो पोलिसांना दाखवत म्हणाली की, तिला हे पैसे धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराच्या चितेवर जाळायचे आहेत. हा प्रसंग धर्मेंद्र यांच्या चाहत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल किती अफाट प्रेम होते, हे दर्शवतो.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीवर शोककळा
धर्मेंद्र हे गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. अखेरच्या महिन्यांमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, एका वेळी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. यापूर्वी त्यांना स्नायूंमध्ये ताण आणि पाठदुखीसारख्या समस्यांमुळेही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
