बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित सध्या मुंबईच्या पावसाचा मनमुराद आनंद घेत आहे. नुकताच तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या गाजलेल्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'ये मौसम का जादू है मितवा' वर डान्स करताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आहे.
( लता दीदींचं ते गाणं ऐकून स्वत:लाच मारायला निघायला डायरेक्टर, काय आहे किस्सा? )
advertisement
'हम आपके हैं कौन'ची आठवण करून देणारा व्हिडिओ
या व्हिडिओत माधुरीने लाल रंगाचा प्रिंटेड को-ऑर्ड सेट घातला आहे. तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतंय. हातात छत्री घेऊन पावसाच्या सरींमध्ये ती आनंदानं नाचताना दिसतेय. 'ये मौसम का जादू है मितवा' हे गाणं ऐकून चाहत्यांना 'हम आपके हैं कौन'मधील निशा आणि प्रेमची जोडी आठवली.
चाहत्यांकडून कौतुकाची बरसात
व्हिडिओ शेअर करत माधुरीनं Let the magic of this season flow! असं कॅप्शन दिलं आहे. माधुरीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलंय, "हे माझं आवडतं गाणं आहे." दुसऱ्याने लिहिलं, "तुमचं हास्य खरोखर जादुई आहे, राणी!" आणखी एक युजर म्हणाला, "माधुरी दीक्षित कोणत्याही ऋतूत आपली जादू दाखवते."
माधुरीने काही दिवसांपूर्वीच तिचा 58 वा वाढदिवस साजरा केला. याच दिवशी तिचा मुलगा अरिन याचा पदवीप्राप्ती समारंभही पार पडला होता. डॉ. श्रीराम नेने यांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या माधुरी चित्रपटांसोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही काम करत आहे. येत्या काळात ती अनेक नव्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आहे.