Vibes = Shaky. Moves = Unstoppable असं कॅप्शन देत माधुरीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. माधुरीने या व्हिडीओत पिक रंगाची सुंदर साडी नेसली आहे. ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. तिच्या केसांमध्ये गुलाबाची फुले माळलेली दिसतात. तर गळ्यात हेवी डिझाइनर नेकलेस तिच्या लूकला चार चाँद लावत आहे. तिच्या या स्टायलिश अंदाजाने चाहते थक्क झाले आहेत. शेकी शेकी गाण्याची हुक स्टेप माधुरीनं इतकी सहज आणि सोपी नाचली आहे की पाहणारा प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडला आहे. माधुरीच्या डान्सचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे.
advertisement
माधुरीचं मराठी प्रेम
माधुरी दीक्षित मराठी असल्याने तिचे मराठी गाण्यांवरचे प्रेम कायमच दिसते. ती यापूर्वीही अनेक मराठी चित्रपट आणि गाण्यांवर नाचली आहे. शेकी शेकीवरील तिचा हा व्हिडीओ मराठी आणि बॉलिवूड चाहत्यांना एकत्र आणणारा ठरला आहे.
शेकी शेकी गाण्याची क्रेझ
संजू राठोडचे 'शेकी शेकी' हे गाणे मराठी संगीत विश्वात खूप गाजले आहे. या गाण्याने सोशल मीडियावर तरुणांमध्ये मोठी क्रेझ निर्माण केली आहे. माधुरीपूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांनी या गाण्यावर रील्स बनवल्या आहेत. शेकी शेकी हे गाणे आता केवळ मराठीत नाही तर बॉलिवूड आणि नॅशनल तसेच इंटरनॅशनल लेव्हलवर देखील लोकप्रिय झालं आहे. माधुरीच्या या रीलने संजू राठोडच्या गाण्याला नवीन ओळख मिळाली आहे.
संजू राठोडचं 'शेकी शेकी' हे एक गाण मागचे कितीतरी महिने सोशल मीडियावर ट्रेडिंग लिस्टमध्ये आहे. हे गाणं खासकरून तरुणांमध्ये आणि रील मेकर्समध्ये लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचं खास बीट्स आणि हुक स्टेप यामुळे अनेकांनी इन्स्टाग्राम, फेसबुकव वर रील्स बनवल्या आहेत.
'शेकी शेकी'च्या शूटींसाठी आकर्षक लोकेशन्स वापरण्यात आलेत. सुरुवातीला हे गाणं YouTube वर रिलीज झालं आणि काही दिवसांतच लाखो व्ह्यूज मिळाले. नंतर हे गाणं बॉलिवूड कलाकार, इन्फ्लुएन्सर्स, आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर नाचत शेअर केल्याने आणखी लोकप्रिय झालं.