फोटोमध्ये दिसणारा हा अभिनेता साधूच्या वेशात आहे. केसांच्या मोठ्या जटा, चेहऱ्याला भस्म, गळ्यात भल्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा, नारंगी वस्त्र परिधान केलेलं आहे. हा अभिनेता सातत्यानं नवे सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो पण या वेशात त्याला कोणीही ओळखू शकत नाहीये.
( पूर्णाआजीच्या रोलसाठी कोणाची एन्ट्री होणार आणि कधी? जुई गडकरीने दिली महत्त्वाची अपडेट )
advertisement
फोटोमध्ये साधूच्या वेशात दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते महेश मांजरेकर आहेत. त्यांच्या पुन्हा शिवाजी राजे भोसले या सिनेमातील हा लुक आहे. या लुकची पहिली झलक एका गाण्यातून समोर आली आहे. 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या सिनेमातील पहिले गीत ‘दुर्गे दुर्घट भारी’ नुकतेच रिलीज झाले आहेत. हे गीत रसिकांच्या मनात भक्तीचा, नवचैतन्याचा संचार करत आहे. पारंपरिक स्तोत्राला आधुनिक संगीताची नवी छटा देत हे गीत तयार करण्यात आलं आहे.
या गीताचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे गीतातून दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी पहिल्यांदाच संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. श्रद्धा आणि संगीतरसाचा सुंदर संगम साधत त्यांनी या आराधनागीताला वेगळाच आविष्कार दिला आहे.
या गीताला शंकर महादेवन यांच्या प्रभावी आणि दैवी आवाजाची साथ लाभली असून ढोल-ताशांचा दणदणाट (वरद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, रुंल सावंत) देवीच्या जयघोषाची अनुभूती देतो. आयडी राव यांच्या हॉर्न्सनी गाण्याला भव्यता दिली आहे. याशिवाय यशराज स्टुडिओमधील विजय दयाल यांनी केलेल्या मिक्सिंग आणि मास्टरिंगमुळे गीत अधिक प्रभावी बनलं आहे.
'दुर्गे दुर्घट भारी' हे केवळ गाणं नसून देवीच्या आराधनेतून निर्माण होणारा भक्तिरसाचा झरा आहे. सध्या हे गीत प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात भक्तीचा आणि उर्जेचा जयघोष घुमवत आहे.