अनेक कलाकार मंडळी कामानिमित्तानं किंवा कायमचेच देशाबाहेर शिफ्ट राहायला गेले आहेत. अशीच एक मराठी अभिनेत्री जी लग्नानंतर अमेरिकेत राहायला गेली आहे. पण सणवार आणि शूटींगनिमित्तानं ती भारतात येत असते. दिवाळीनिमित्तानं ही अभिनेत्री नुकतीच भारतात परतली. ती मुंबईत आली असून मुंबईत येताच तिनं अंडरग्राऊंड मेट्रोचा गारेगार प्रवास केला. अभिनेत्रीनं मेट्रो प्रवासाचा खास व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
advertisement
"मेट्रो प्रवास आणि आनंदी वातावरण, आमच्या एक्सटेन्डेट फॅमिलीसोबतच सुंदर क्षण", असं म्हणत अभिनेत्रीनं व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती मोठ्या उत्साहानं पायऱ्या उतरून मेट्रोमध्ये प्रवेश करताना दिसतेय. त्यानंतर मेट्रोमध्ये प्रवेश करुन तिनं प्रवासाचा मनोमन आनंद घेतला.
( साडेतीन तास बायकोला उन्हात ताटकळत ठेवलं, नेमकं काय घडलं? प्रसाद-मंजिरीच्या पहिल्या भेटीचा किस्सा)
अश्विनींची मेट्रो भावेंनाही भावल्याचं दिसतंय. अश्विनींची मेट्रो म्हणजेच मेट्रो वुमन अश्विनी भिडे आणि भावे म्हणजेच अभिनेत्री अश्विनी भावे. आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. मराठी अभिनेत्री अश्विनी भावे सध्या अमेरिकेत राहतात. दिवाळी निमित्तानं अश्विनी भावे मुंबईत आल्या आहेत. तेव्हा आई आणि फॅमिलीबरोबर त्यांनी अंडरग्राऊंड मेट्रोची सफर केली. विदेशात राहत असल्या तरी त्यांचं मुंबईवर असलेलं प्रेम पुन्हा एकदा दिसून आलं.
मेट्रो प्रवासात अश्विनी भावे यांनी सुंदर साडी नेसली होती. त्यांना साडीत चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य त्या किती आनंदी आहे हे दाखवून देत आहे. अश्विनी यांच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या साडीचंही कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, सुपर, मला तुमची साडी आणि मुंबई वाइब आवडली. दुसऱ्यानं लिहिलंय, तुम्ही आज लिंबू कलर ची साडी नेसायला पाहिजे होती.
कोण आहेत अश्विनी भिडे?
'मेट्रो वुमन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांनी 2015 मध्ये मुंबई मेट्रो लाईन 3 च्या सुरुवातीच्या बांधकाम टप्प्याची जबाबदारी स्वीकारली. अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे . त्यांनी एमबीए केले आहे. त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), शिक्षण विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सध्या त्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून काम करतात.
अश्विनी भावे वर्कफ्रंट
अश्विनी भावे यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्या 'घरत गणपती' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांचे काही सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अश्विनी या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचे फोटोशूट, अमेरिकेतील त्यांच्या घराची सफर, त्यांनी लावलेली झाडे या सगळ्याची माहिती ते त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.
