नियती राजवाडे म्हणाली,"रिलेशनशिपवर आता विश्वास राहिलेला नाही. सध्याच्या घडीला माझ्या मुलासाठी त्याची आई अख्खी त्याची आहे. उद्या जर मी वेगळ्या माणसाचा विचार केला तर कुठेतरी मी विभागले जाईल. आधीच तो एका सिंगल पॅरेन्टबरोबर आयुष्य काढत आहे. त्याला गरज आई किंवा बाबा दोघांचीही आहे आणि ती जर व्यक्ती त्याच्यासोबत नसेल, काही कारणाने वेळ देऊ शकत नसेल. त्यामुळे मग मी जर सिंगल मदर आहे तर त्याला मी वेळ देईल, त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची जबाबदारी माझी आहे".
advertisement
नियती पुढे म्हणाली,"ही एक प्रकारे माझी इन्वेस्टमेंट आहे विथ नो रिटर्न. त्याने मला परत तेवढा वेळ द्यावा, अशी माझी अजिबाद अपेक्षा नाही. कारण उद्या तो मोठा होणार त्याचं त्याचं जगणार पण कुठेतरी मला माझ्या मुलाबद्दल प्रचंड विश्वास आहे. कारण काहीही झालं तरी आई मी तुला सोडून कुठे जाणार नाही हे तो आता बोलतोय आणि पुढे जाऊन अक्कल आल्यानंतरही तो हेच बोलेल यावर माझा विश्वास नव्हे आत्मविश्वास आहे. मला कित्येक रात्र झोप यायची नाही. माझं राहतं घर होतं. त्या ओळखीच्या नावचं माझं स्वत:चं घर होतं. ते एका रात्रीत मला सोडावं लागलं. एका भाड्याच्या घरात येऊन राहायचं. मग तिथे भाडं भरणं, लाइटबिल भरणं, मी जर बाहेर गेले तर माझ्या मुलाला कसं सांभाळलं जाईल, हा विचार असायचा. आपला मुलगा सेफ हॅन्डमध्ये असावा हे नेहमीच बॅक ऑफ द माईंट असतं". नियतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
