TRENDING:

'सगळंच ताटात वाढून हवं...' लग्नासाठी मुलांकडे अवास्तव मागण्या करणाऱ्यांवर बरसली मराठमोळी अभिनेत्री, VIDEO

Last Updated:

Shweta Shinde Slammed Girls: एका मुलाखतीमध्ये श्वेता शिंदेने ज्या पद्धतीने लग्नाळू मुली आणि त्यांच्या पालकांची कानउघडणी केली आहे, ते पाहून सोशल मीडियावर तिचे प्रचंड कौतुक होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आजकाल लग्नाच्या बाजारात मुलगा निर्व्यसनी आहे का? स्वभाव कसा आहे? यापेक्षा त्याच्याकडे स्वतःचा 2BHK फ्लॅट आहे का, याला जास्त महत्त्व दिलं जातंय. पण याच विषयावर आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे हिने थेट बॉम्ब टाकला आहे. एका मुलाखतीमध्ये श्वेताने ज्या पद्धतीने लग्नाळू मुली आणि त्यांच्या पालकांची कानउघडणी केली आहे, ते पाहून सोशल मीडियावर तिचे प्रचंड कौतुक होत आहे. श्वेताने केवळ प्रश्नच विचारले नाहीत, तर लग्नाच्या बदललेल्या व्याख्येवर आरसाच धरला आहे.
News18
News18
advertisement

...तर लग्न कशाला करता?

श्वेता शिंदेने आजच्या काळातील एका विदारक वास्तवावर बोट ठेवलंय. ती म्हणते, "आजकाल मुलींची पहिली मागणी असते की मुलाकडे स्वतःचं घर हवं. पण मला सांगा, वयाच्या पंचविसाव्या वर्षी एखाद्या मुलाकडे स्वतःचा फ्लॅट कसा असेल? त्याच्या करिअरची तर ती नुकतीच सुरुवात असते."

'ती मला मिठी मारते...', 51 वर्ष लहान अभिनेत्रीला केलं किस, VIRAL VIDEO वर राकेश बेदींची पहिली प्रतिक्रिया

advertisement

श्वेताने पुढे अत्यंत मार्मिक प्रश्न विचारला की, जर मुलाच्या आई-वडिलांनीच पैसे देऊन त्याच्या नावावर घर बुक करायचं असेल आणि त्यानंतर मुलगी लग्नाला 'हो' म्हणणार असेल, तर त्या मुलीचं त्या संसारात योगदान काय? तिने स्पष्ट शब्दांत सुनावलं की, "जर तुम्हाला सर्व काही ताटात वाढूनच हवं असेल, तर मग लग्न कशाला करता? संसार म्हणजे दोघांनी मिळून शून्य उभं करणं असतं."

advertisement

श्वेताने टोचले मुलींचे कान

श्वेताच्या मते, लग्नानंतर दोघांनी मिळून कष्ट करावेत, पैसे साठवावेत आणि मग एखादं घर घ्यावं. त्या घराच्या वास्तूशांतीच्या पूजेला जेव्हा दोघं जोडीने बसतात, तेव्हा जो आनंद मिळतो, तो तयार घरात जाण्यात कधीच नसतो. "मिळून घर खरेदी करा, एकमेकांना साथ द्या, त्यात खरी गंमत आहे," असं म्हणत तिने संघर्षातून मिळणाऱ्या यशाचं महत्त्व पटवून दिलं.

advertisement

मुलीच्या पालकांनाही आरसा दाखवला!

केवळ मुलींनाच नाही, तर त्यांच्या पालकांनाही श्वेताने खडे बोल सुनावले आहेत. तिने विचारलं की, "मुलीच्या आई-वडिलांनी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारावा की, जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं किंवा जेव्हा ते २५ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्याकडे स्वतःचं घर किंवा कार होती का?" तिने पालकांना सल्ला दिला की, घराची अपेक्षा करण्यापेक्षा मुलाचं कर्तृत्व बघा. मुलगा सज्जन आहे का? तो निर्व्यसनी आहे का? त्यात पैसा कमवण्याची जिद्द आहे का? हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण जे घर मुलाच्या वडिलांनी विकत घेतलंय, त्यावर त्या मुलाचं कर्तृत्व सिद्ध होत नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिव्यांग मुलांना देण्यात आले कृत्रिम बुद्धिमतेचे प्रशिक्षण,हा उपक्रम नेमका काय?
सर्व पहा

श्वेता शिंदेचा हा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. विशेषतः तरुण मुलांनी श्वेताचे आभार मानले आहेत, कारण लग्नाच्या बाजारात घर नसल्यामुळे अनेक मुलांची लग्नं रखडली आहेत. श्वेताने मांडलेले हे विचार आजच्या पिढीसाठी एक रिॲलिटी चेक ठरत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'सगळंच ताटात वाढून हवं...' लग्नासाठी मुलांकडे अवास्तव मागण्या करणाऱ्यांवर बरसली मराठमोळी अभिनेत्री, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल