'ती मला मिठी मारते...', 51 वर्ष लहान अभिनेत्रीला केलं किस, VIRAL VIDEO वर राकेश बेदींची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:
Rakesh Bedi Controversy: रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयाने प्रेक्षक प्रेमात पडले असतानाच, या चित्रपटातील दिग्गज अभिनेते राकेश बेदी यांना मात्र सोशल मीडियावर नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
1/9
बॉक्स ऑफिसवर सध्या 'धुरंधर' या चित्रपटाने अक्षरशः राडा घातला आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयाने प्रेक्षक प्रेमात पडले असतानाच, या चित्रपटातील एका दिग्गज अभिनेत्याला मात्र सोशल मीडियावर नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ते नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी.

advertisement
2/9
चित्रपटात बाप-लेकीची भूमिका साकारणाऱ्या राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राकेश बेदी यांनी साराचे स्टेजवर स्वागत करताना तिला मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर किस केले.

3/9
या गोष्टीवरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राकेश बेदींना ट्रोल करायला सुरुवात केली. आता यावर राकेश बेदींनी आपल्या खास शैलीत ट्रोलर्सचे कान टोचले आहेत.

4/9
आदित्य धर यांच्या 'धुरंधर'मध्ये राकेश बेदी एका राजकारण्याच्या भूमिकेत आहेत, तर सारा अर्जुन त्यांच्या मुलीच्या रोलमध्ये आहे. फिल्मच्या एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान सारा स्टेजवर आल्यावर राकेश बेदी यांनी तिला प्रेमाने जवळ घेतले. मात्र, काही युजर्सनी या व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावत त्यावर आक्षेपार्ह कमेंट्स करण्यास सुरुवात केली.

5/9
या ट्रोलिंगवर गप्प न बसता राकेश बेदींनी एका मुलाखतीत आपले मन मोकळे केले. ते म्हणतात,
या ट्रोलिंगवर गप्प न बसता राकेश बेदींनी एका मुलाखतीत आपले मन मोकळे केले. ते म्हणतात, "सारा वयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहे. चित्रपटात ती माझी मुलगी आहे आणि सेटवरही आमचं बॉण्डिंग अगदी तसंच आहे. ती मला भेटली की एखाद्या मुलीने वडिलांना मिठी मारावी, तशीच मारते. पण लोक जे काही बरळत आहेत, ते पाहून मला वाटतंय की लोकांच्या नजरेतच खोट आहे."
advertisement
6/9
राकेश बेदींनी पुढे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले,
राकेश बेदींनी पुढे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, "तिचे आई-वडील तिथेच हजर होते. मग पाहणाऱ्यांना यात वावगं काय दिसतंय? लोकांना फक्त व्हायरल होण्यासाठी एखादा मुद्दा हवा असतो. मी एवढ्या वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे, मी काय भर स्टेजवर काही चुकीचं कृत्य करेन का? मला वाटतं हे लोक वेडे झाले आहेत."
advertisement
7/9
राकेश बेदी हे सिनेसृष्टीतील एक सन्माननीय नाव आहे. अनेक दशकांपासून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सारा अर्जुन, जिने 'धुरंधर'मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत, ती राकेश बेदींचा आदर एका वडिलांप्रमाणेच करते. अशा निखळ नात्याला व्हायरल होण्यासाठी ट्रोल करणे, हे आजच्या सोशल मीडिया युगातील एक मोठे दुर्दैव आहे.

8/9
काही चाहत्यांनी मात्र राकेश बेदींची पाठराखण केली आहे.
काही चाहत्यांनी मात्र राकेश बेदींची पाठराखण केली आहे. "प्रत्येक गोष्टीला अश्लील चष्म्यातून पाहणे थांबवा," अशा शब्दांत चाहत्यांनी ट्रोलर्सना सुनावले आहे.
advertisement
9/9
एकीकडे हा वाद सुरू असला तरी 'धुरंधर'ची घोडदौड थांबलेली नाही. चित्रपटाने आतापर्यंत ६४० कोटींहून अधिक कमाई केली असून, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्यातील पडद्यावरील बाप-लेकीचं नातं प्रेक्षकांना खूप भावत आहे. वैयक्तिक आयुष्यातील या अफवांकडे दुर्लक्ष करून राकेश बेदी आता आपल्या पुढील कामावर लक्ष केंद्रित करत आहेत.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement