‘दशावतार’ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. प्रीमियर सोहळ्यात आदित्य ठाकरे यांनी चित्रपटाच्या टीमची भेट घेतली. सगळ्यांसोबत हात मिळवून त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण, जेव्हा त्यांनी दिलीप प्रभावळकरांना पाहिलं, तेव्हा त्यांनी एक खूपच खास गोष्ट केली.
advertisement
आदित्य ठाकरे स्वतःहून दिलीप प्रभावळकरांकडे गेले. सुरुवातीला त्यांनी हस्तांदोलन केलं, पण नंतर ते लगेचच त्यांच्या पायाला स्पर्श करून वाकले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. आदित्य ठाकरेंची ही विनम्रता पाहून सगळेच अचंबित झाले. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे आणि लोक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
आदित्य ठाकरेंच्या संस्कारांचं होतंय कौतुक
आदित्य ठाकरेंच्या या कृतीवर नेटकऱ्यांनी उत्तम संस्कार असल्याचं म्हटलं आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका ज्येष्ठ कलाकाराचा असा आदर केल्यामुळे त्यांचे खूप कौतुक होत आहे.
‘दशावतार’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. यात दिलीप प्रभावळकरांसोबतच महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांसारखे अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.