मुकेश खन्ना म्हणाले, " जेव्हणा रणवीर सिंगने बोल्ड फोटोशूट केलं होतं पण त्यावेळी मी स्पष्टपणे म्हणालो की हे आमच्या दृष्टीने योग्य नाही. तेव्हा तो मला म्हणालेला मी कंफर्टेबल आहे यामध्ये पण मी म्हणालो आम्ही नाहीत पण'.
अजय देवगणचा सुपरफ्लॉप सिनेमा, आता ओटीटीवर उडवलीय खळबळ; बनला नंबर 1
त्याचबरोबर, मुकेश यांनी सोशल मीडियावरील अश्लीलतेविषयी देखील बोलले. ते म्हणाले, "काहीजण म्हणतात आमच्याकडे आहे तर आम्ही फ्लॉंट करणार मग बाथरुममध्ये जा जे करायचंय ते कर पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की आपण लहान कपडे घालून काहीही करु शकतो. युट्यूब आणि ओटीटीवर अशी सामग्री तरुणांना गोंधळात टाकते. चौथ्या वर्गातल्या मुलांची आता बारावीतली मेन्टॅलिटी झालीय." मुकेश खन्ना यांनी यासाठी सेन्सॉर बोर्ड आणण्याची शिफारस केली. ते म्हणाले, “मी खासदार किंवा नगरसेवक नाही, पण जर मला बोलायचे असेल तर बोलतो. लोकांना योग्य आणि चुकीचा फरक शिकवणे गरजेचे आहे.”
advertisement
पुढे ते म्हणाले 'आपल्या मुलांवर प्रेम असल्यास, त्यांना चुकीच्या प्रकारच्या डिजिटल सामग्रीपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये.' मुकेश खन्ना यांचे हे विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे.