TRENDING:

'प्रेमाची गोष्ट 2' बघायला गेलेल्या प्रेक्षकांना मिळालं खास सरप्राइज! मराठीतील पहिल्या फ्रेंचाइजी चित्रपटाचा चौथा भाग येतोय

Last Updated:

Marathi Movie : 'प्रेमाची गोष्ट 2' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना खास सरप्राइज मिळालं. ते सरप्राइज पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झालेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा 'प्रेमाची गोष्ट 2' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. दरम्यान 'प्रेमाची गोष्ट 2' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना खास सरप्राइज मिळालं आहे. 'प्रेमाची गोष्ट 2' पाहण्याआधीच प्रेक्षकांना त्यांच्या आणखी एका लाडक्या सिनेमाच्या पुढच्या भागाची गुड न्यूज मिळाली आहे. मराठीतल्या पहिल्या फ्रेंचाइजी सिनेमाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
News18
News18
advertisement

सतीश राजवाडे दिग्दर्शित 'मुंबई-पुणे-मुंबई 4' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'प्रेमाची गोष्ट 2' या सिनेमाच्या सुरुवातीलाच 'मुंबई-पुणे-मुंबई 4'ची घोषणा करण्यात आली आहे. 'प्रेमाची गोष्ट 2' या सिनेमाबरोबर थिएटरमध्ये 'मुंबई-पुणे-मुंबई 4' या सिनेमाचा ट्रेलर दाखवण्यात येत आहे.

( पुष्कर जोगचा नवा सायकोलॉजिकल थ्रिलर ड्रामा, पोस्टर पाहूनच येईल अंगावर काटा; या दिवशी होतोय रिलीज )

advertisement

गौरी आणि गौतम म्हणजे अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची निर्मिती संजय छाब्रिया आणि अमित भानुशाली यांनी केली आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई 4' हा पहिला मराठी फ्रेंचाइजी सिनेमा आहे .

सतीश राजवाडे यांनी मटाशी बोलताना सांगितलं, "मुंबई- पुणे- मुंबई 4 ची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे हे मी जाणतो. सिनेमा लिहून पूर्ण आहे निर्मात्यांनी तो वाचला आहे. सुयोग्य वेळी सिनेमाचं शूटींग सुरू करणार आहोत."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

'मुंबई-पुणे-मुंबई' हा सिनेमा 2010 साली रिलीज झाला होता. मराठीतील काही कल्ट क्लासिक सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. त्यानंतर 2015 साली 'मुंबई-पुणे-मुंबई 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर 2018 साली 'मुंबई-पुणे-मुंबई 3' प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिन्ही सिनेमांपैकी पहिल्या पार्टला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता सिनेमाच्या चौथ्या भागात काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'प्रेमाची गोष्ट 2' बघायला गेलेल्या प्रेक्षकांना मिळालं खास सरप्राइज! मराठीतील पहिल्या फ्रेंचाइजी चित्रपटाचा चौथा भाग येतोय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल