नागराज मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 साली झाली. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावात जन्मलेल्या नागराज मंजुळे यांच्या घरची परिस्थिती हालाकीची होती. जुन्या चालीरीती, परंपरांनुसार नागराज बारावीत असताना त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. त्यांना अभ्यासात तसा फार रस नव्हता. चित्रपटांकडे त्यांचा सर्वाधिक ओढा होता. शाळेचं दप्तर मित्राकडे ठेवून ते सिनमा पाहायला जायचे.
advertisement
( 'हे टाका सगळीकडे, कळूदे सगळ्यांना'; प्रियाने सगळ्यांसमोर आणला न पाहिलेला उमेश कामत, VIDEO )
नागराज हे त्यांच्या घरात सर्वाधिक शिकलेले एकमेव आहेत. परिस्थिती बेताची असली तरी त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. MA आणि MFil पूर्ण केलं. पण सिनेमाचं खुळ त्यांच्या डोक्यातून काही गेलं नाही. त्यामुळे त्यांनी मास कम्युनिकेशनचा कोर्स केला. प्रोजेक्ट म्हणून पिस्तुल्या ही शॉर्ट फिल्म केली ज्याला पुढे जाऊन राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
नागराज यांचं पुण्यात शिक्षण सुरू असताना असे दिवस आले होते जेव्हा त्यांना 6 दिवस फक्त मसाला शेंगदाणे आणि वडापाव खाऊन दिवस काढावे लागले होते. नागराज यांना घरून डबा यायचा पण काही दिवस तो आलाच नाही. दररोज हॉटेलमध्ये खाणं त्यांना परवडत नव्हतं त्यामुळे शेंगदाणे आणि वडापाववर दिवस काढेल लागले.
नागराज यांचा लिखाणाची प्रचंड आवड. कविता लिहिणं हा तर त्यांचा छंद होता. सिनेमा करायचं म्हणजे पैसा गवा. सुरूवातीच्या काळात हातात पैसा नव्हता. अशा अडथळ्याच्या वेळी त्यांनी रात्री वॉचमन म्हणून काम केलं. दिवसा ते लोकांच्या कपड्यांनी इस्त्री देखील करून द्यायचे. लोकांचे कपडे इस्त्री करण्यापासून ते अमिताभ बच्चन सारख्या महानायकाबरोबर स्टेजवर झळकण्यापर्यंचचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी होता.
2010मध्ये आलेल्या पिस्तुल्या या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2013 साली आलेल्या फ्रँड्री सिनेमाचाही राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्यात आला. नंतर सैराट आला आणि नागराज मंजुळे यांची यशस्वी घोडदौड पुढे सुरू राहिली. सैराट हा मराठीत 100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला. सिनेमा 69 वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.