TRENDING:

कारगिल युद्धात 15 दिवस सैनिकांसोबत राहिले नाना पाटेकर; म्हणाले 'आपण देशासाठी एवढं तरी...'

Last Updated:

आजच्या तरुण पिढीलाही नाना पाटेकर भुरळ घालतात. पण चित्रपटसृष्टीत काम करण्याआधी नाना पाटेकर नेमकं काय करत होते याविषयी खूप कमी जणांना माहिती आहे. नाना पाटेकर हे काही काळ भारतीय लष्करात काम करत होते. नुकतंच त्यांनी कारगिलच्या युद्धाचा एक प्रसंग सांगितलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नाना पाटेकर गेल्या 46 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी आजवर अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. नानांचे संवाद आणि त्याची शैली आजही लोकप्रिय आहे. आजच्या तरुण पिढीलाही नाना पाटेकर भुरळ घालतात. पण चित्रपटसृष्टीत काम करण्याआधी नाना पाटेकर नेमकं काय करत होते याविषयी खूप कमी जणांना माहिती आहे. नाना पाटेकर हे काही काळ भारतीय लष्करात काम करत होते. नुकतंच त्यांनी कारगिलच्या युद्धाचा एक प्रसंग सांगितलं आहे.
नाना पाटेकर
नाना पाटेकर
advertisement

नाना पाटेकर काही काळ प्रादेशिक लष्करात काम करायचे. पण त्यानंतर त्यांना अभिनयात संधी मिळाळी. नाना यांना एका पाठोपाठ एक चांगल्या भूमिकाही मिळाल्या. याचदरम्यान कारगिलचं युद्ध सुरु झालं. या युद्धावेळी त्यांनी काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला आणि लाइट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये मेजर म्हणून रुजू झाले. एवढंच नाही तर नाना चांगले खेळाडू देखील होते. त्यांनी नेमबाज म्हणून अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदकेही पटकावली आहेत. 'द ललनटॉप'ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांना 1991 च्या कारगिल युद्धादरम्यान त्यांच्या कामाबद्दल खुलासा केला आहे.

advertisement

ओठांना चावला कुत्रा, सर्जरीनंतरही गेल्या नाहीत 'त्या' खुणा; अभिनेत्रीनं केला शॉकिंग खुलासा  

नाना पाटेकर म्हणाले, 'मी या युद्धावेळी क्विक रिॲक्शन टीमचा सदस्य झालो होतो. हे एक शक्तिशाली टीम होती. देशासाठी आपण एवढं तरी करू शकतो. आपलं सर्वात मोठं शस्त्र आपले सैनिक आहेत.' असं नाना म्हणाले. स्पेशल रिॲक्शन टीम म्हणजे एक अशी टीम जी नेहमी युद्ध किंवा आपत्तीदरम्यान लोकांच्या मदतीसाठी नेहमी सुसज्ज राहते.

advertisement

याच मुलाखतीत नानांनी त्यांनी आजवर कुठल्या राजकीय पक्षात जाण्याचा विचार केलाय का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, 'मी कधीही त्याचा भाग होऊ शकत नाही कारण मी स्पष्टवक्ता आहे. मला जे वाटतं ते मी तोंडावर बोलतो. मी कुठल्या पक्षप्रमुखांना वेडं म्हणालो तर ते माझी पक्षातून हकालपट्टी करतील.' असं म्हणत नानांनी ते राजकारणात प्रवेश करणार नसल्याचा खुलासा केला.

advertisement

'इंडिया टुडे' च्या रिपोर्टनुसार, 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान नाना पाटेकर पंधरा दिवस सैनिकांसोबत राहिले आणि त्यांच्यासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत होते. इतकंच नाही तर नाना पाटेकर यांनी ‘प्रहार’ चित्रपटासाठी मराठा लाईट इन्फंट्रीकडून प्रशिक्षणही घेतलं होतं.

मराठी बातम्या/मनोरंजन/
कारगिल युद्धात 15 दिवस सैनिकांसोबत राहिले नाना पाटेकर; म्हणाले 'आपण देशासाठी एवढं तरी...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल