अभिनेत्री निवेदिता सराफ यांची आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका आई कुठे काय करते या मालिकेच्या जागी सुरू झाली होती. डिसेंबर 2024 रोजी ही मालिका सुरू झाली होती. त्यानंतर आता अवघ्या दहा महिन्यातच मालिका संपणार आहे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
advertisement
या दिवशी शेवटचा एपिसोड
आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेचे शेवटचे काही एपिसोड सुरू आहेत. ही मालिका सोमवार ते शनिवार प्रवाह दुपारमध्ये 2 वाजता टेलिकास्ट होत होती. पण आता ती मालिका संपणार असून या मालिकेच्या जागी रुपाली भोसले हिची लपंडाव ही मालिका सुरू होणार आहे. लपंडाव ही मालिका 15 सप्टेंबरपासून सुरू होतेय. याचाच अर्थ आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेचा शेवटचा एपिसोड 13 सप्टेंबरला टेलिकास्ट होणार आहे.
आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतही एका आईची गोष्ट दाखवण्यात आली. रिटायरमेन्टनंतर घरातील आई आणि बाबांची परिस्थिती दाखवण्यात आली. मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण नव्या मालिकेच्या गर्दीत जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत.
'थोडं तुझं थोडं माझं'ही संपणार
आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेबरोबरच शिवानी सुर्वे हिची थोडं तुझं थोडं माझं ही मालिकाही संपणार आहे. या मालिकेच्या जागी नशीबवान ही मालिका सुरू होणार आहे. नशीबवान ही मालिका 15 सप्टेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सुरू होणार आहे. म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा शेवटचा एपिसोड 12 सप्टेंबर रोजी टेलिकास्ट होणार आहे.