प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख याने रात्री 3 वाजून 2 मिनिटांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रितेशचं ट्विट चर्चेत आलं आहे. रितेशनं ट्विट करत लिहिलंय, जय हिंद की सेना... भारत माता की जय... ऑपरेशन सिंदूर.
( Operation Sindoor : भारताच्या एअर स्ट्राइकचे टार्गेट का ठरलं बहावलपूर? वाचा Inside Story )
रितेशसह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री देओलिना हिनं लिहिलंय, धर्म विचारून गोळ्या मारल्या. भारताच्या आत्म्यावर हल्ला केला. आता मातीत जाल. जय हिंद. जय भारत. जय हिंद की सेना. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून स्ट्राईक केला.
निर्माते मधुर भांडारकर यांनीही ट्विट करत लिहिलंय, आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र, आम्ही एकत्र उभे आहोत. जय हिंद, वंदे मातरम.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला. ज्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. हे लोक भारतातील विविध भागातून पर्यटनासाठी आले होते. आतंकवाद्यांनी त्यांना धर्म विचारून गोळ्या मारल्या. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.