चित्रपटाची कथा गाव, जंगल आणि परंपरांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यातला नायक शिव सुरुवातीला एक सामान्य तरुण वाटतो, पण कथानक पुढे सरकताना त्याची खरी ओळख उलगडते. तो देव आणि माणसांमधला दुवा असल्याचं दिसून येतं. चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना थरारून टाकतो. ‘देवाचं नृत्य’ असं म्हटलं जाणारं ते दृश्य इतकं ताकदीचं आहे की लोक थिएटरमधून बाहेर पडूनही बराच काळ त्याबद्दल बोलत राहतात.
advertisement
50 रुपये उधार घेऊन घराबाहेर पडलेला अभिनेता, आज OTT चा किंग, घेतो तगडी फी!
या चित्रपटाची ताकद फक्त कथानकात नाही, तर कलाकारांच्या अभिनयातही आहे. ऋषभ शेट्टीने अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही स्वतःला सिद्ध केलं. सप्तमी गौडा, किशोर, अच्युत कुमार यांसारख्या कलाकारांनीही आपल्या भूमिकांनी वेगळी छाप सोडली. तुम्हाला आता या सिनेमाचं नाव समजलंच असेल. हा सिनेमा आहे, 'कांतारा'.
या चित्रपटाला IMDb वर 8.2 रेटिंग मिळालं असून, त्याचा रनटाईम 2 तास 30 मिनिटांचा आहे. हिंदीसह अनेक भाषांमध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. या सिनेमाचा आता दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही पुढील भागासाठी उत्सुक आहेत.