पराग त्यागीने सोशल मीडियावर गणेश चतुर्थी साजरी करण्याचा एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये तो जड अंतःकरणाने आणि दुःखी डोळ्यांनी बाप्पाची पूजा करताना दिसत आहे. त्याने लिहिलंय, "परीला नेहमीच असं वाटत होतं की बाप्पाचं आगमन आणि त्यांच्या आशीर्वादांची सीरिज कधीही थांबू नये. या वर्षीही बाप्पानं येऊन तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला माझ्या बाळा... आम्ही सर्वांनी एकत्र विसर्जन केलं. नेहमी हसत राहा. आई सुनीता जरीवाला यांनी खूप मेहनत घेतली होती." बाप्पाची पूजा करताना परागने छातीवर काढलेल्या शेफालीच्या टॅटूवर एक हात ठेवला होता. जणू काही शेफाली त्याच्याबरोबरच आहे आणि तो तिच्याबरोबर बाप्पाची आरती करत आहे.
advertisement
( जितेंद्रची हिरोईन, 25 व्या वर्षी झाली विधवा; दुसऱ्या लग्नात होती 7 महिन्यांची प्रेग्नंट )
परागने शेअर केलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांचं प्रेम मिळतंय. चाहत्यांनी व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. कमेंट करताना एका युझरने लिहिलंय, "हा माणूस अविश्वसनीय आहे. मी आजपर्यंत असा माणूस कधीच पाहिला नाही. आजच्या काळात इतके प्रेम करणारा माणूस कुठे सापडतो" दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "त्यांचे प्रेम पाहून नेहमीच अश्रू येतात."
अभिनेत्री आरती सिंगनेही पराग त्यागीच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. ती लिहिते, "शेफू... ती नेहमीच तुमच्यासोबत असते. सीआयडी आणि अनुपमा फेम जसवीर कौरने "गणपती बाप्पा मोरया" अशी कमेंट केली आहे.
