जितेंद्रची हिरोईन, 25 व्या वर्षी झाली विधवा; दुसऱ्या लग्नात होती 7 महिन्यांची प्रेग्नंट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवुडची ती अत्यंत सुंदर अभिनेत्री जी अवघ्या 25 व्या वर्षी विधवा झाली. नंतर 37 व्या वर्षी तिच्या दुसऱ्या नवऱ्याचंही निधन झालं. या अभिनेत्रीने संजीव कुमार, किशोर कुमार आणि जितेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
advertisement
advertisement
लीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिच्या खऱ्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. ती खूप लहान वयात विधवा झाली. तीही एकदा नाही तर दोनदा. वयाच्या 25 व्या वर्षी लीना चंदावरकरने गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा मुलगा सिद्धार्थशी लग्न केले. काही काळानंतर त्यांचे निधन झाले.
advertisement
advertisement
1988 साली वयाच्या 37व्या वर्षी लीनाने किशोर कुमारशी लग्न केलं. काही काळानंतर किशोर कुमारचं निधन झालं आणि लीना दुसऱ्यांदा विधवा झाली. लीना चंदावरकरचा जन्म 29 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील धारवाड शहरातील एका कोकणी मराठी कुटुंबात झाला. तिचे कुटुंब सुशिक्षित आणि शिस्तप्रिय होते. तिचे वडील लष्करी अधिकारी होते. लीनाला लहानपणापासूनच कलेची आवड होती आणि ती अनेकदा शालेय नाटकांमध्ये भाग घेत असे.
advertisement
advertisement
लीनाने तिच्या कारकिर्दीत 1970 आणि 80च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले. तिने 'हमजोली', 'हनीमून', 'मेहबूब की मेहंदी', 'मंचली', 'दिल का राजा', 'एक महल हो सपनो का', 'बिदाई', 'प्रीतम', 'बैराग', 'कैद' आणि 'यारों का यार' सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
लीनाने 1980 मध्ये किशोर कुमारशी लग्न केलं त्यावेळी ती प्रेग्नंट होती. लीना आणि किशोर कुमार यांनी दोन वेळा लग्न केलं होतं. एक नोंदणीकृत लग्न होते आणि दुसरे हिंदू रितीरिवाजांनुसार. 1977 मध्ये सिनेप्लॉटला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत लीनाने खुलासा केला की तिच्या हिंदू लग्नादरम्यान ती सात महिन्यांची प्रेग्नंट होती.


