TRENDING:

परदेसी गर्ल इरिनाने केली सूरज चव्हाणच्या मरिमातेची आरती, VIDEO आला समोर!

Last Updated:

सूरज चव्हाण आणि त्याची गोलीगत स्टाईल लोकांनी खूप व्हायरल केली. सोशल मीडियावर तर त्याच्या डायलॉगवर अनेक व्हिडिओदेखील बनवले जात आहेत. सूरज चव्हाण बिग बॉस ट्रॉफी जिंकून आल्यापासून सतत चर्चेत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सूरज चव्हाण आणि त्याची गोलीगत स्टाईल लोकांनी खूप व्हायरल केली. सोशल मीडियावर तर त्याच्या डायलॉगवर अनेक व्हिडिओदेखील बनवले जात आहेत. सूरज चव्हाण बिग बॉस ट्रॉफी जिंकून आल्यापासून सतत चर्चेत आहे. त्याचे नवनवे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. अशातच आता सूरजचा नवा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये तो त्याच्या मरिआईची पूजा करताना दिसतोय.
परदेसी गर्ल इरिनाने केली सूरज चव्हाणच्या मरिमातेची आरती
परदेसी गर्ल इरिनाने केली सूरज चव्हाणच्या मरिमातेची आरती
advertisement

सूरज चव्हाण मरिआईची पूजा करताना यावेळी त्याच्यासोबत परदेसी गर्ल इरिना रुडकोवा देखील होती. याशिवाय वैभव चव्हाण देखील होता. तिघांनी मिळून आई मरिआईची पूजा केली. तिघांचा आरती करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Suraj Chavan: सूरज चव्हाणने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला सर्वांनी स्टेटस ठेवा!

बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणचं सगळ्याच स्पर्धकांसोबत समीकरण चांगलंच होतं. बाहेर आल्यावरही बाकीचे स्पर्धक त्याला भेटत आहेत. त्याच्यासोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत आहेत. सध्या सूरज, इरिना आणि वैभवचा हा व्हिडिओ चर्चेत आहे.

advertisement

दरम्यान, बिग बॉसमध्ये असताना सूरज चव्हाणने वेळोवेळी आई मरिआईचा उल्लेख केला. ही माताच त्याची आई-बाप सगळेच असल्याचं तो म्हणाला. आता बाहेर आल्यावर तो दर्शनालाही गेल्याचं पाहायला मिळालं.

सूरज चव्हाण सोशल मीडिया स्टार होताच. आपल्या हटके स्टाईलने तो सतत चर्चेत असायचा. मात्र बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तो अधिक चर्चेत आला आहे. आता लोक त्याला जास्त प्रेम देऊ लागले आहेत. त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. सूरजशिवाय बाकी स्पर्धकांनाही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलंय.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
परदेसी गर्ल इरिनाने केली सूरज चव्हाणच्या मरिमातेची आरती, VIDEO आला समोर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल