पवन सिंगसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर खूप ट्रोलिंग झाली. आता यावर घटनेवर अभिनेत्री अंजली राघवने मौन सोडलं आहे. ती म्हणाली, "माझ्या कपड्यावर काही टॅग लागला असेल म्हणून मी प्रसंग हसत हसत टाळला. पण नंतर समजलं की काहीच नव्हतं. मग मला खूप वाईट वाटलं. त्या क्षणी मी काही बोलले नाही कारण ती गर्दी पवन सिंहची चाहती होती. जर मी आवाज उठवला असता तर मला कुणी साथ दिली असती का? म्हणून मी शांत राहिले."
advertisement
'4 मुलींना गमावलं, बाळाचं प्लॅनिंग केलं पण...; सनी लियोनीचा शॉकिंग खुलासा, IVF च्या वेळी काय घडलं?
अंजली पुढे म्हणाली, "मी घरी आल्यावर लोक मला विचारत होते,‘तू का काही बोलली नाहीस?’, ‘तू हसत का होतीस?’ पण माझी चूक काय आहे? जर कोणी मुलीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करत असेल तर ते चुकीचेच आहे. मग तो कोणताही स्टार असो.”
अभिनेत्रीने हेही उघड केले की काही लोकांनी तिला सल्ला दिला, “पवन सिंहची पीआर टीम खूप स्ट्राँग आहे, काही बोलू नकोस, नाहीतर उलट तुझ्यावरच वाईट लिहलं जाईल.” म्हणून अंजली काही दिवस गप्प राहिली. पण प्रकरण हाताबाहेर गेल्यावर तिने इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर करून सगळं खरं सांगितलं.
सगळ्या प्रकरणानंतर अंजलीने मोठा निर्णय घेतला, "मी आता भोजपुरी इंडस्ट्रीत काम करणार नाही. मला हरियाणामध्येच आनंद आहे. माझ्या कुटुंबासोबत, माझ्या लोकांसोबत मला छान वाटतं. या घटनेनं मला शिकवलं की कधी कधी नवीन गोष्टी करून बघणं महागात पडतं. माझी ही चूक होती की मी विश्वास ठेवला." नेटिझन्स अंजलीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी म्हटलं, “तू योग्य निर्णय घेतलास. अशा प्रसंगाला कुणीही बळी पडू नये.”