श्रद्धा कपूरसोबत प्रथमेशची खास भेट
प्रथमेशच्या निधनानंतर त्याचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातला सर्वात खास व्हिडिओ म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबतची त्याची भेट. २०२४ मधील एका कार्यक्रमात प्रथमेशने श्रद्धाची भेट घेतली होती. तिथे त्याने श्रद्धाला विनंती केली होती की, "मराठीत दोन शब्द बोला." श्रद्धानेही अगदी लाघवी स्वरात, "काय सांगू मी आता... इथे आले मी... आपण बोलतोय... मला खूप मज्जा येतेय!" असं म्हणत त्याला दाद दिली होती.
advertisement
साऊथमध्ये सिद्धार्थ जाधवचा कडक स्वॅग! विजय सेतुपती आणि अरविंद स्वामींसोबत हटके जुगलबंदी
इतकंच नाही, तर प्रथमेशने तिला पुरणपोळी आणि मोदक खायला येण्याचं आमंत्रण दिलं होतं, त्यावर श्रद्धा म्हणाली होती, "अरे बापरे, आता मला भूक लागली!" हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पतीनंतर आता घरचा कर्ता मुलगाही गेला...
प्रथमेशचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय होतं. कोरोनाच्या काळात त्याने आपल्या वडिलांना गमावलं होतं. घराची सर्व जबाबदारी त्याच्या तरुण खांद्यावर आली होती. त्याने हार न मानता आपली आई प्रज्ञा कदम यांनाही रिल्सच्या जगात आणलं. माय-लेकाची ही जोडी सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली. आईच्या डोळ्यांतील अश्रू पुसणारा आणि त्यांना पुन्हा जगायला शिकवणारा आधारस्तंभच आता कायमचा निखळला आहे.
काय होतं निधनाचं नेमकं कारण?
गेल्या महिनाभरापासून प्रथमेश रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याचा मित्र आणि प्रसिद्ध रिलस्टार तन्मय पाटकर याने दिलेल्या माहितीनुसार प्रथमेशला टायफॉइड आणि रक्तामधील कावीळ झाली होती. बऱ्याच काळापासून त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र या दीर्घ आजाराशी त्याची झुंज अपयशी ठरली. डान्सर, कोरिओग्राफर आणि एक उत्तम अभिनेता असलेल्या प्रथमेशने अनेक म्युझिक अल्बममध्येही काम केलं होतं.
कधीही न भरून निघणारी पोकळी
प्रथमेशच्या एक्झिटने त्याच्या आई आणि बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सई उत्तेकर, अंकिता वालावलकर आणि अनेक इन्फ्लुएन्सर्सनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रथमेशच्या चाहत्यांनीही त्याच्या निधनावर हळहळ व्यक्त केली असून त्याच्या आई आणि बहिणीचे सांत्वन केले आहे.
