TRENDING:

'हे टाका सगळीकडे, कळूदे सगळ्यांना'; प्रियाने सगळ्यांसमोर आणला न पाहिलेला उमेश कामत, VIDEO

Last Updated:

Priya Bapat-Umesh Kamat Video : अभिनेत्री प्रिया बापटनं आजवर न पाहिलेल्या उमेशबद्दल सगळ्यांना सगळं सांगून टाकलं. प्रियाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पडद्यावर हिरो, नवरा, बॉयफ्रेंडचे रोल साकारणं तसं सोपं असतं पण या भूमिका जेव्हा खऱ्या आयुष्यातही निभावाव्या लागतात तेव्हा मात्र चांगलाच कस निघतो. अभिनेता उमेश कामतसोबतही असंच काहीस झालंय. पडद्यावर हिरो असला तरी खऱ्या आयुष्यात नवरा म्हणून अभिनेता उमेश कामत कसा असतो याची पोलखोल त्याच्या बायकोनेच केली आहे. 'कळू दे सगळ्यांना' म्हणत प्रियानं सगळ्यांसमोर उमेशची पोलखोल केली.
News18
News18
advertisement

उमेश आणि प्रिया यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँचिग सोहळा नुकताच पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. दरम्यान सगळ्यांशी संवाद साधताना प्रियानं आजवर न पाहिलेल्या उमेशबद्दल सगळ्यांना सगळं सांगून टाकलं. प्रियाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

( Priya Bapat : छन छन छन! प्रिया बापटसोबत 'रात्रीस खेळ चाले', दादरच्या घरात मध्यरात्री 3चा थरार )

advertisement

व्हिडीओमध्ये प्रिया म्हणते, "आपलं जेवण झाल्यानंतर निदान आपलं ताट उचलून आपण सिंकमध्ये ठेवावं. आमच्या लग्नाला आता 14 वर्ष होतील. आता इतकं सांगून सांगून त्याला ती सवय लागली. तो आता स्वत: ओटा आवरतो. पण ओटा आवरतो म्हणजे काय, अशी दहीहंडीच्या रथासारखी भांडी एकावर एक भांडी रचलेली असतात. असं कोण ठेवतं सिंकमध्ये. एकावर एक थर नुसते. हे माझं म्हणणं आहे, हे टाका तुम्ही सगळीकडे. कळू देत सगळ्या नवऱ्यांना आणि बायकांना."

advertisement

बिन लग्नाची गोष्ट या सिनेमात रिअल लाईफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत परत एकदा रील लाईफमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने असे दमदार कलाकार या सिनेमात आहेत. 12 सप्टेंबरला हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. हा सिनेमा फक्त नात्यांवर भाष्य करणारा नसून तो प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा आहे. नातं टिकवण्यासाठी परस्परांवरील विश्वास, मोकळेपणा आणि जिव्हाळा हाच खरा पाया आहे. या कथेत प्रेक्षकांना हे सगळं अनुभवता येईल.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'हे टाका सगळीकडे, कळूदे सगळ्यांना'; प्रियाने सगळ्यांसमोर आणला न पाहिलेला उमेश कामत, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल