लग्नाला 14 वर्ष पूर्ण होताच उमेश कामतने प्रिया बापटला रोमँटिक अंदाजात सरप्राइज दिलं. प्रियाने व्हिडीओ शेअर करत लिहिलं, "जेव्हा मला वाटतं की तो फारसं व्यक्त होत नाही… तेव्हाच तो असं गोड सरप्राईज देतो. माझा जगातील आवडता माणूस. दसऱ्याच्या दिवशी आजपासून 14 वर्षांपूर्वी आम्ही सात फेरे घेतले."
advertisement
या पोस्टसह प्रियानं व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, प्रिया आरशात बघत तयार होतेय. तितक्यात मागून उमेश येतो. हातात फुलांचा गुलदस्ता घेऊन तो प्रियाच्या पुढ्यात गुडघ्यावर बसतो. तयार होण्यात मग्न असलेली प्रिया अचानक आलेल्या उमेशला पाहून घाबरते. आणि पुढच्या क्षणी त्याच्याकडे पाहून मोठ्याने हसते. उमेश प्रियाला गुलदस्ता देतो आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात.
12 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र
प्रिया आणि उमेश यांचा बिन लग्नाची गोष्ट हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने उमेश आणि प्रिया तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकले. या सिनेमाच्या निमित्तानं प्रिया आणि उमेश यांच्या ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळला.