Priya Bapat-Umesh Kamat: 8 वर्ष डेटिंग, बॅन्ड्रा रिक्लमेशनवर रोमान्स; प्रिया-उमेश यांची Filmy Love Story !

Last Updated:
Umesh Kamat-Priya Bapat Love Story : कॉलेजमधलं प्रेम, बॅन्ड्रा रिक्लमेशन रोमान्स ते 12 वर्षांचा सुखाचा संसार. अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा इथपर्यंतचा प्रवास फारच इंट्रेस्टिंग आहे. दोघांची लव्हस्टोरी देखील हटके आहे.
1/10
मराठी इंडस्ट्रीतील क्यूट कपलपैकी एक म्हणजे अभिनेते उमेश कामत आणि प्रिया बापट. ही जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिनही प्रेक्षकांची कायम फेव्हरेट राहिली आहे. दोघांनी आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

advertisement
2/10
दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री जर इंट्रेस्टिंग आहे तशीच त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री देखील त्याहून हटके आहे. उमेश आणि प्रिया यांची लव्हस्टोरी इंडस्ट्रीत फेमस आहे. आपल्याहून आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या उमेशला प्रियाने मोठ्या हिंमतीनं पटवलं होतं.

3/10
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीजमध्ये प्रिया बापटच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक झालं. यावेळी द फ्री प्रेस जर्नल ने घेतलेल्या खास मुलाखतीत तिनं त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती.

4/10
प्रियाने सांगितल, "उमेश आणि मी दोघंही बाल कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. मी दहावी पूर्ण केल्यानंतर एका मराठी टीव्ही शोमध्ये काम करत होते. शूटिंगचा शेवटचा दिवस होता आणि तेव्हाच आम्ही पहिल्यांदा भेटलो. आम्ही नंबर एक्सचेंज केले पण त्यानंतर जवळपास 1 वर्ष आमच्यात कोणताही संपर्क नव्हता."

5/10
प्रिया पुढे म्हणाली, "मी विल्सन कॉलेजमध्ये शिकत होते आणि उमेश रूपारेल कॉलेजमध्ये होता. रूपारेल कॉलेजच्या प्रिन्सिपलची मुलगी माझी मैत्रीण होती. जी माझ्यासोबतच शिकत होती. तिच्यामार्फतच आम्ही पुन्हा भेटलो आणि मग आमचं बोलणं सुरू झालं."

6/10
प्रियानं बोलताना कबूल केलं की, "मी उमेशवर अक्षरश: फिदा झाले होते.  तो आभाळमाया आणि  वादळवाट सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम करत होता. तेव्हा मी शाळेत होते आणि त्याचा अभिनय मला खूप आवडायचा. मी त्याचr फॅन होते. त्यामुळे एक दिवस मीच त्याला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली."

7/10
प्रिया शेवटी म्हणाली, "मला त्याच्याशी बोलायला थोडी भीती वाटायची कारण मी त्याच्यापेक्षा तब्बल 8 वर्षांनी लहान होते. त्यामुळे तो मला फारसे गांभीर्यानं घेत नव्हता. पण त्याला हे माहित होतं की मी कुठल्याही नात्याला खेळ समजत नाही. मी गंभीर आहे आणि नात्याबाबत वचनबद्ध राहू इच्छिते, हे उमेशला जाणवले आणि तेव्हापासून आमचं नातं खऱ्या अर्थाने सुरू झालं."

8/10
प्रिया आणि उमेश यांनी 8 वर्ष डेटिंग केलं. डेटिंगच्या काळात दोघे बँड्रा रिक्लमेशनच्या कट्ट्यावर फिरायला जायचे. झी मराठी अवॉर्डमध्ये उमेशनं एक रंजक किस्सा सांगितला होता. तो म्हणाला, "आम्ही डेटिंग करत होतो तेव्हा रिक्लमेशनवर फिरायला जायचो. पावसाळ्याचे दिवस होते."

9/10
"रिक्लमेशनवर अनेकजण फोटो काढतात. तेव्हा एका न्यूज पेपरच्या फोटोग्राफने रिक्लमेशनचा फोटो काढला होता. तो फोटो दुसऱ्या दिवशी न्यूज पेपरच्या फ्रंट पेजवर छापून आलो होतो. त्यात मी आणि उमेश स्पष्टपणे दिसत होतो."

10/10
प्रिया म्हणाली, "मी सकाळी पेपर पाहिला आणि माझी झोपच उडाली. मला एका नातेवाईकाने विचारलंही होतं की ही प्रिया आहे का? मी तेव्हा माझ्या घरातले आणि ओळखीच्या सगळ्यांकडून तो पेपर घरी घेऊन आले आणि फाडून टाकले होते."

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement