राजामौलींकडून ‘देसी गर्ल’चे स्वागत
12 नोव्हेंबर 2025 रोजी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिने दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रियंका चोप्राचा ‘ग्लोबट्रॉटर’ फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत तिचं दमदार स्वागत केलं. त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं,“ही महिला जिने भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नवा आयाम दिला. देसी गर्ल, वेलकम बॅक! जगाला तुझ्या मंदाकिनीचे असंख्य रंग पाहायची आतुरता आहे.”
advertisement
प्रियंकाने शेअर केला फर्स्ट लूक
प्रियंका चोप्रानेही आपला ‘ग्लोबट्रॉटर’ चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. फर्स्ट लूक शेअर करत तिने भन्नाट कॅप्शन लिहिलं आहे,"ती दिसते त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे... मंदाकिनीला हॅलो म्हणा". पोस्टरमध्ये ‘देसी गर्ल’ प्रियंका पिवळ्या रंगाची साडी, पायात कोल्हापुरी आणि हातात बंदूक घेतलेली दिसत आहे. पण या लूकचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिचा अॅक्शन मोड. हाहात बंदूक घेऊन प्रियंका उभी आहे.
बॉलिवूडकरांना प्रियकांच्या चित्रपटाची प्रतीक्षा
प्रियंकाच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलेब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या ‘गुंडे’ चित्रपटातील को-स्टार रणवीर सिंहने लिहिलं, “व्हेरी कूल”, तर आर. माधवनही प्रियंकाच्या या लूकवर फिदा झाला आणि कमेंट केली आहे की,“काय लूक आणि काय इम्पॅक्ट आहे!”. याशिवाय भूमी पेडणेकरसह अनेक सेलिब्रिटींनीही ‘देसी गर्ल’च्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
'RRR' नंतर राजामौलींचा सर्वात मोठा प्रोजेक्ट
एस.एस. राजामौली यांचा हा चित्रपट गेल्या बराच काळापासून चर्चेत आहे. सांगितलं जातंय की, ‘आरआरआर’च्या प्रचंड यशानंतर हा त्यांचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. अद्याप या चित्रपटाचं अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. तरी सध्या त्याला SSMB29 या नावाने ओळखलं जातं. मात्र, 15 नोव्हेंबर 2025 रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या लॉन्च इव्हेंटमध्ये या चित्रपटाचं अधिकृत नाव जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
