भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार आहे. 'ह्युमन कोकेन' असं सिनेमाचं नाव आहे. हा एक धाडसी, सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा असून यात मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि ड्रग कार्टेलचं काळं जग दाखवण्यात येणार आहे.
( OTT Release This Week : या आठवड्यात OTT वर पाहा 7 फिल्म आणि सीरिज; घरबसल्या मनोरंजनाचा फुल ऑन डोस )
advertisement
या सिनेमात पुष्करची एक प्रभावी आणि आव्हानात्मक भूमिका असणार आहे. 'व्हिक्टोरिया – एक रहस्य'च्या यशानंतर पुष्कर आता पूर्णपणे वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर आधारित सिनेमात झळकणार आहे. सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. ज्यात पुष्करचा भयानक लुक दिसतोय. एक डोळा फुटलेला, संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला आणि कॉलरवर पांढरी पावडर सांडलेली दिसत आहे.
सिनेमाबद्दल बोलताना पुष्कर म्हणाला, ''ह्युमन कोकेन' हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक सिनेमा आहे. या पात्रात शिरण्यासाठी मी मानसिक आणि शारीरिक तयारीसोबत बऱ्याच कार्यशाळा केल्या. एका गुन्हेगारी जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीचा अंतर्गत संघर्ष समजून घेणं अजिबात सोपं नव्हतं."
या सिनेमात पुष्करबरोबर अभिनेत्री इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही ब्रिटिश कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाचं शूटींग युनायटेड किंगडममध्ये झालं आहे. 'ह्युमन कोकेन' हा सिनेमा पुढच्या वर्षी 16 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.
